बडनेरा ते बिझीलॅंड शहर बस सेवा सुरु करा- माजी गटनेता चेतन पवार

    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : माजी गटनेता चेतन पवार यांनी बुधवार दिनांक १४ सप्‍टेंबर,२०२२ रोजी बडनेरा ते बिझीलॅंड शहर बस सेवा सुरु करण्‍यात यावी याबाबत मनपा आयुक्‍त डॉ.प्रविण आष्‍टीकर यांना निवेदन दिले.

    Thank you for reading this post, don't forget to subscribe!

    अमरावती महानगरपालिकेद्वारे आपली परिवहन हि बस सेवा पुर्ण शहर भर सुरु आहे. बडनेरा ते रहाटगाव ही बससेवा सुध्‍दा सध्‍या स्थितीत सुरळीत सुरु आहे. आमची आपणास विनंती आहे की, बडनेरा ते बिझीलॅंड हि बस सेवा सुरु करण्‍यात यावी वरील बस सेवा ही बडनेरा, अमरावती जुना बायपास या मार्गाने सुरु करण्‍यात यावी. कारण बडनेरा येथे बिझीलॅंडला जाणारा व्‍यापारी वर्ग भरपुर प्रमाणात राहतो. त्‍याचप्रमाणे दस्‍तुरनगर, कवर नगर तसेच रामपुरी कॅंम्‍प या भागातील व्‍यापारी व तेथे काम करणारा गोरगरीब कर्मचारी हा दररोज बिझीलॅंड मध्‍ये जात असतो. अमरावती महानगरपालिकेनी ही बस सेवा सुरु केल्‍यास व्‍यापारी वर्गाला सुविधा होईल व अमरावती महानगरपालिकेला या बस सेवेतुन उत्‍पन्‍न सुध्‍दा मिळेल करीता आपणास विनंती आहे की, वरील बस सेवा त्‍वरीत सुरु करण्‍याबाबत अशी मागणी माजी गटनेता चेतन पवार यांनी केली.