‘पी. एम. किसान’ योजनेच्या लाभार्थ्यांना आता किसान क्रेडिट कार्ड देणार

    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील पी.एम.किसान योजनेच्या लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी 30 सप्टेंबर पर्यंत विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. विशेष ग्रामसभा घेऊन मोहिमेबाबत शेतकऱ्यांना सूचित करण्यात येणार आहे. लाभार्थी शेतकऱ्यांनी किसान क्रेडिट कार्ड मिळण्यासाठी संबंधित बँकांकडे अर्ज व अनुषंगिक कागदपत्रे सादर करून किसान क्रेडिट कार्ड सुविधेचा लाभ घ्यावा. कार्ड अक्रियाशील असल्यास ते क्रियाशील करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक राजेश लव्हेकर यांनी केले आहे.

    Thank you for reading this post, don't forget to subscribe!

    पात्र लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड प्रदान करण्याचे उद्यिष्ट शंभर टक्के पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्राच्या सूचनेप्रमाणे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांना कार्ड उपलब्ध्‍ा करून देण्यासाठी मोहिम राबविण्यात आली आहे.