दिलखुलास’ कार्यक्रमात पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग यांची मुलाखत

    मुंबई, : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून तसेच ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवरून मंगळवार, १३ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. वरिष्ठ सहायक संचालक मीनल जोगळेकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.

    Thank you for reading this post, don't forget to subscribe!

    या मुलाखतीत जनावरांमध्ये आलेल्या लम्पी साथ आजाराची लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना, घ्यावयाची काळजी, साथ आजार आटोक्यात आणण्यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या प्रतिबंधात्मक उपाय योजना तसेच शेतकरी वर्गाने पशुधनाच्या सुरक्षेसाठी घ्यावयाची काळजी याबाबतची सविस्तर माहिती, श्री. सिंग यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमात दिली आहे.

● हे वाचा – देवस्थान इनाम वर्ग 3 जमीन आणि वंचित विमुक्त व भटक्या जमाती, भिक्षेकरी भटक्या जमाती..!