• Mon. Jun 5th, 2023

” दारिद्र्य “

  माझ्या अठराविश्व दारिद्र्याची गर्भगाथा,
  आईच्या चिरकुटात नि बाच्या पंचाच्या
  सतरा गाठीत बंदिस्त होती,
  लावलेल्या ठिगळांवर प्रकाशीत होती.
  दारिद्र्य झिरपलं ते झोपडीत येणा-या अपगांत…
  भोगलं ते इराविना विव्हळणा-या
  कोकरांच्या विवंचनेतून….
  दारिद्र्य तर माझा जिवलग मित्रच होता…!
  पेटते जेव्हा जग भाकरीचे
  तेव्हा करांचाही होतो नकाशा जगाचा..,
  पादांची होतात पादत्राणे आणि
  रूपही हरवते जीवनाच्या आयन्यात….,
  तेव्हा आयुष्य नकोसं होतं …
  दारिद्र्या !
  तूच नारे ….!
  अमिष भक्षकांचा कांगावा करून
  हक्काची बोळवन केली होतीस आमच्या
  आणि विटाळ म्हणून गावकुसाबाहेर वाळीत टाकलं होतंस….!
  कोणता गुन्हा केला होता ?
  काय कसूर होता आमचा ?
  दारिद्र्यात जन्मलो एवढाच ना..?
  पण आता
  दारिद्र्यात जन्मलो तरी मरणार नाही,
  मुलांना शिकविल्याशिवाय राहणार नाही
  गुलामीत वारसांचा बळी पुन्हा देणार नाही.
  – अरूण विघ्ने
  (पक्षी काव्यसंग्रहातून १९९० काळातील)
  ——————–

  आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!

  – बंडूकुमार धवणे
  संपादक गौरव प्रकाशन
  ——————–

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *