तीन महिन्यांचे मोफत पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण व मार्गदर्शन

  * पोलीस होऊ ईच्छीतणाऱ्या उमेदवारांसाठी शोध प्रतिष्ठानचे विशेष आयोजन
  * जास्तीत जास्त उमेदवारांनी सुवर्ण संधीचा लाभ घेण्याचे यश खोडके यांचे आवाहन
  गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

   अमरावती (प्रतिनिधी) : पोलीस दलात भरती होऊन पोलीस सेवा करण्याचे अनेक उमेदवारांचे स्वप्न असते. त्यामुळे ते पोलीस भरती प्रक्रियेची आतुरतेने वाट पाहत असतात . मात्र या संदर्भातील योग्य मार्गदर्शन व प्रशिक्षण मिळत नसल्याने अनेकांचे पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न अपूर्ण राहते. राज्यातील अनेक पुढारलेल्या शहरांमध्ये या संदर्भात मार्गदर्शन वर्ग चालवून उमेदवारांना महागडे प्रशिक्षण दिले जाते. मात्र अमरावती सारख्या शहरांमध्ये अशा प्रकारची व्यवस्था नसल्याने येथील उमेदवार हे पोलीस सेवेत जाण्यास मागे पडत आहे. त्यामुळे अशा उमेदवारांना सुवर्ण संधी म्हणून यश खोडके यांच्या संकल्पनेतून शोध प्रतिष्ठानच्या वतीने मोफत पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण व मार्गदर्शन महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

   Thank you for reading this post, don't forget to subscribe!

   तीन महिन्यांच्या कालावधी करिता जिल्हा स्टेडियम प्रांगण, मोर्शी रोड अमरावती येथे सदरचे मार्गदर्शन व प्रशिक्षण महाशिबीर लवकरच आयोजित करण्यात येणार असून यामध्ये अमरावती मधील उमेदवारांनी मोठ्या संख्येने सहभाग दर्शविण्याला घेऊन रेल्वे स्टेशन चौक स्थित आ. सौ. सुलभाताई संजय खोडके यांचे जनसंपर्क कार्यालय येथे नोंदणी प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत उमेदवारांना पोलीस भरतीचे इत्यंभूत मार्गदर्शन जसे की, पोलीस भरती पत्रात, शारीरिक क्षमता चाचणी ज्यामध्ये धावणे , गोळा फेक, उंच उडी, पुल अप्स, आदींचे प्रशिक्षण हे मास्टर ट्रेनर कडून दिल्या जाईल. तसेच लेखी परीक्षेसंदर्भात जसे की, पेपर पॅटर्न, सामान्य ज्ञान, अभिक्षमता चाचणी, मराठी व्याकरण, गणित, तसेच वेळेचे नियोजन, अभ्यासाचे तंत्र, मुलाखत पद्धत आदींचे सुद्धा सखोल मार्गदर्शन हे तज्ज्ञ मंडळींकडून देण्यात येणार आहे.

   आजच्या युवा पिढीला शारीरिक दृष्ट्या मजबूत करून त्यांना विधायक कार्याकडे वळविण्यासाठी व पोलीस दलात भरती होऊन देश सेवा घडविण्यासाठी मोफत पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण व मार्गदर्शन महाशिबिराचे आयोजन करण्यात आले असून जास्तीत जास्त उमेदवारांनी या सुवर्ण संधीचा लाभ घेण्याचे आवाहन शोध प्रतिष्ठानचे सचिव यश खोडके यांनी केले आहे. यासाठी नोंदणी करिता रेल्वे स्टेशन चौक स्थित आ.सौ.सुलभाताई संजय खोडके यांचे जनसंपर्क कार्यालय येथे प्रत्यक्ष भेट देऊन अथवा ९७३६०२९०९०, ९३७१८१८७८४, ७३८७२६६९७० या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन सुद्धा शोध प्रतिष्ठानचे सचिव यश खोडके यांनी केले आहे.