जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रयत्नाने अनुकंपा भरती प्रक्रियेला गती

    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद व नगरपंचायतीतील बिंदुनामावली मागासवर्ग कक्षातर्फे प्राधान्याने अद्ययावत करण्यात आली असून, जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या प्रयत्नांनी अनुकंपा भरती प्रक्रियेला गती मिळाली आहे.

    Thank you for reading this post, don't forget to subscribe!

    जिल्ह्यामध्ये एकुण दहा नगरपालिका व चार नगरपंचायती आहेत. नगरपरिषद व नगरपंचायती यांच्या आस्थापनेवरील अनुकंपा पात्र उमेदवारांचे नियुक्त्या या रिक्त पदे व बिंदुनामावली अद्ययावत नसल्याने रखडल्या होत्या. तथापि, जिल्हाधिकारी श्रीमती कौर यांनी वेळोवेळी पाठपुरावा करुन व बैठका घेऊन बिंदूनामावली अद्ययावत करुन घेतली. तसेच प्रतिक्षासुची प्रसिध्द करुन प्रक्रियेला वेग दिला.

● हे वाचा -आयुष्यात मोठे व्हा ! पण किती?

    नगरपालिका शाखेतील जिल्हास्तरीय अनुकंपा सामाईक प्रतीक्षायादीमधून गट-क व गट-ड उमेदवारांची जेष्ठतेनुसार नगरपरिषद व नगरपंचायत मधील रिक्त जागांवर शिफारस करण्याबाबत बैठकही नुकतीच झाली.जिल्हास्तरीय अनुकंपा सामाईक प्रतीक्षायादीमध्ये गट-क च्या एकूण 28 व गट-ड साठी एकूण 8 उमेदवारांची प्रतीक्षासूची प्रसिध्द करण्यात आली आहे. या प्रतीक्षायादीमधून नियमाप्रमाणे गट-क व गट-ड संवर्गातील एकूण रिक्त जागेच्या 20 टक्क्यांप्रमाणे गट-क साठी एकूण 7 व गट-ड साठी एकूण 2 उमेदवारांची जेष्ठतेनुसार अनुक्रमे लिपिक टंकलेखक व शिपाई आणि व्हॉल्वमन या पदांसाठी या पदांसाठी रिक्त पद असणाऱ्या नगरपरिषद व नगरपंचायतीमध्ये शिफारस करण्यात आलेली आहे.