Recent in Technology

Advertisement

Breaking News

गौरी...

    बुलढाण्याच्या लेकीनं
    फडकवला लंडनला झेंडा
    तिचं हे धाडस पाहून
    कित्ता गिरवेल पुढे तांडा
    काॅमवेल्थच्या खेळात
    रोवलं तिनं निशाण
    जिल्ह्यातील जनतेला
    आहे तिचे मोठे भूषण
    कळंबेश्वर या गावाचं
    नाव इतिहासात गाजलं
    ढोल ताशाच्या गजरात
    देशाचं नाव मोठं वाजलं
    चक्क गौरीची मैदानावर
    तळपली शिवबा तलवार
    खेचून आणला विजय
    आपल्याकडे अलवार
    अथांग जनसमुदाय समोर
    खेळला दमदार खेळ
    तिरंगा फडकवण्याची
    तिनं अचूक साधली वेळ
    तिच्या या कामगिरीला
    करू आपण सलाम
    मान उंचावली जिल्ह्याची
    आनंदीत जनता तमाम
    -पी के पवार
    सोनाळा बुलढाणा
    ९४२१४९०७३१

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code