Header Ads Widget

मालवीय चौक, चौधरी चौक ते शेगावं नाका परिसरात अतिक्रमण निर्मूलनाची कार्यवाही

    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : महानगरपालिकेतर्फे अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात येत आहे. शहरातील रस्‍त्‍यांवर अस्‍थायी स्‍वरुपाचे अतिक्रमण असल्‍यामुळे शहरात अतिक्रमण निर्मूलनाची मोहीम राबविण्यात येत आहे.

    बुधवार दिनांक २४ ऑगस्‍ट,२०२२ रोजी अतिक्रमण विभागामार्फत मालवीय चौक पासून कार्यवाहीला सुरुवात करण्‍यात आली. त्‍यानंतर चौधरी चौक, शेगावं नाका रोडवरील अतिक्रमण निर्मुलनाची कार्यवाही करण्‍यात आली. मालवीय चौक ते चौधरी चौक ते शेगावं नाका रोडच्‍या दोन्‍ही बाजुंनी सदर अतिक्रमण निर्मुलन व अनधिकृत बांधकाम पाडण्‍याची कार्यवाही करण्‍यात आली.

    या कार्यवाहीमध्‍ये वालकंपाऊंड, टिनाचे बांधकाम, पानठेले, अनधिकृत दुकाने, दुकानाचे शेड, बॅनर, पोस्‍टर, मुख्‍य रस्‍त्‍यावरील अतिक्रमण नष्‍ट करुन रोड व फुटपाथ मोकळे करण्‍यात आले. जेसीपीद्वारे अतिक्रमण निर्मूलनाची कार्यवाही करण्‍यात आली. महानगरपालिकेतर्फे अतिक्रमण निर्मूलनाची मोहीम राबविण्याचा निर्णय मनपा आयुक्‍त डॉ.प्रवीण आष्‍टीकर यांनी घेतला. अनधिकृत आणि वाहतुकीस अडथळा करणाऱ्या अतिक्रमणांवर कारवाईची मोहीम सुरू करण्यात आली.

    सदर कार्यवाही दरम्‍यान अतिक्रमण पथक प्रमुख अजय बन्‍सेले, अतिक्रमण विभागाची टिम, झोनची टिम व पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्‍येने उपस्थित होते. सर्व अतिक्रमण धारकांना सूचित करण्यात येते की, मुख्य मार्गावर, नालीवर, फूटपाथवर हातगाड्या, खोके, भाजीपाला दुकाने विनापरवानगी लावण्यात येऊ नये अन्यथा अतिक्रमण विभागातर्फे अतिक्रमण काढण्याची कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी. असे कळविले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या