अमरावती (प्रतिनिधी) : एनजीओ नीट फाऊंडेशन यांच्या वतीने जनुना गावी डिजिटल आर्थिक साक्षरता कार्यक्रम संपन्न झाला. माहिती व आयोजन नीट फाऊंडेशन चे राजेंद्र कावळे यांनी केले. त्यांनी बँकेचे व्यवहार, सेविंग अकाऊंट, करंट अकाऊंट, इन्शुरन्स, ए.टी.एम चा वापर, अर्थिक फसवणूक, फेक कॉल्स केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना या योजनेपासून सामान्य वर्ग वंचित असतो जसे की प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना, प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना, विशेष म्हणजे दहा वर्षाखालील मुलींसाठी प्रधानमंत्री सुकन्या समृध्दी योजना बचत खाता, प्रधानमंत्री श्रमनिधी मानधन पेन्शन योजना, प्रधानमंत्री अटल पेन्शन योजना, किसान सन्मान निधी योजना, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, आयुष्यमान भारत योजना या सर्व योजना सर्व सामान्य जीवनासाठी अत्यंत महत्वाच्या आहेत या बाबत मोलाचे मार्गदर्शन या कार्यक्रमात करण्यात आले.
गावांतील महीला वर्ग हा डिजिटल व्हावा ए.टी.एम चे व्यवहार डिजिटल व्यवहार करावा विशेष म्हणजे ग्रामीण भागातील जनतेमधे अर्थिक व्यवहार कसे असले पाहिजे व डिजिटल तंत्रद्यान तसेच चांगल्या पैशाचे व्यवस्थापन या विषयी जनजागृति करण्यात आली. या कार्यक्रमासाठी अर्थिक सौजन्य फिनकेअर बँक च्या वतीने यावेळी गावातील जनतेचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला या प्रसंगी फिंनकेअर बँक चे सी. एस.आर वरिष्ठ अधिकारी सौरभ वार्डेकर साहेब, तसेच गावकऱ्यांच्या उपस्थितीत सहभाग प्रमाणपत्र चे वाटप देखील करण्यात आले.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या