अमरावती (प्रतिनिधी) : सणासुदीच्या दिवसात खवा, मावा, मिठाई, खाद्यतेल, वनस्पती व तूप इत्यादी अन्न पदार्थांना मोठया प्रमाणात मागणी असते. त्यामध्ये भेसळ होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनातर्फे अन्न आस्थापनेची तपासणी करण्याची विशेष मोहिम सुरू केली आहे. ही मोहिम डिसेंबर 2022 पर्यंत राबविण्यात येणार आहे.
अन्न आस्थापनेच्या तपासणी विशेष मोहिमेंतर्गत गणेशोत्सवात प्रसाद वाटप करतांना मंडळांनी स्वच्छतेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. जेणेकरून विषबाधेसारखी अप्रिय घटना घडणार नाही. गणपती मंडळाने स्वत: तयार केलेल्या प्रसादाचे वाटप करावे. तसेच प्रसाद तयार करण्याची जागा स्वच्छ ठेवावी. प्रसादात शक्यतोवर कोरड्या पदार्थांचा समावेश असावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त श. म. कोलते यांनी केले आहे.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या