Recent in Technology

Advertisement

Breaking News

महिलांची आर्थिक सुबत्ता हेच बचत गटांच्या उभारणीचे फलित आ.सौ. सुलभाताई खोडके

    * सरस्वती नगर येथे सिद्धिविनायक महिला बचत गटाच्या तिसऱ्या शाखेच्या शुभारंभ
    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : गत २० वर्षांपासून सिद्धिविनायक महिला बचत गट सहकारी पतसंस्था अमरावतीच्या वतीने महिलांना आर्थिक दृष्टीने स्वयंपूर्ण होण्याकरिता बळ दिले जात आहे. महिला भगिनींच्या समस्यांचे निराकरण करण्यासह त्यांना महिला बचत गटांच्या चळवळीतील माहिती देऊन व त्यांना सोबत घेत महिलांना प्रगत, उन्नत व विकसित करण्यावर आपला भर आह. बचतीचा वेग वाढवीत महिलांनी सामूहिक ऐक्याचा परिचय देऊन सामाजिक प्रगती व उन्नतीसाठी पुढे येणे , हीच आज आगामी काळाची गरज आहे. राजापेठ, गाडगे नगर नंतर आता सरस्वती नगर येथील सिद्धिविनायक महिला बचत गट सहकारी पत संस्था च्या माध्यमातून महिलांना बचतीचे मोल पटवून देणे व प्रगतीची कास धरण्यासाठी आपण सदैव तत्पर असून त्यांच्या सोबत आहोत. असे प्रतिपादन आमदार सौ . सुलभाताई संजय खोडके यांनी केले . शहारस्थित नवीन कॉटन मार्केट समीपस्थ सरस्वती नगर येथील यादव मार्केट मध्ये सिद्धिविनायक महिला बचत गट सहकारी पतसंस्थेच्या तिसऱ्या नूतन शाखेचा शुभारंभ करण्यात.

    याप्रसंगी सर्वप्रथम आमदार सौ. सुलभाताई खोडके यांनी फीत कापीत या पतसंस्था कार्यालयाच्या शुभारंभाची औपचारिकता साधली. यावेळी जया निंभोरकर व अनुराधा बरडे, वैशाली पेठे यांनी शाल-श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन आमदार सौ. सुलभाताई खोडके यांचा सत्कार केला.महिला बचत गटाच्या कार्यप्रणाली संदर्भात विस्तृत माहिती देत आमदार महोदयांनी यावेळी उपस्थित महिलांना बहुमूल्य मार्गदर्शन केले. महिला सबलीकरण व सक्षमीकरणासाठी महिलांचा सामाजिक,आर्थिक तसेच सर्वांगीण विकास होणे आवश्यक आहे. यासाठी त्यांनी आपल्या अंगीभूत कौशल्यातून तसेच योग्य प्रशिक्षण व मार्गदर्शनातून स्व-उद्योगाची कास धरावी, बचतीच्या माध्यमातून आर्थिक विकास साधावा असे आवाहन करीत महिलांची आर्थिक सुबत्ता हेच बचत गटांच्या उभारणीचे फलित असल्याचे गौरवोद्गार आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी व्यक्त केले. यावेळी महिलांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त करीत बचतगटां-संदर्भातील आपले विचार व कार्य याबाबत उपस्थितांना अवगत केले. सरस्वती नगर भागात सिद्धिविनायक महिला बचत गट सहकारी पतसंस्थेची तिसरी शाखा कार्यान्वित झाल्याने आसपासच्या सभासद,व ग्राहकांना चांगली सुविधा मिळणार आहे.

    कार्यक्रम प्रसंगी वैशाली पेठे, जया निंभोरकर, प्रिती भादेराव, निलिमा मानिकपुरे, ज्योत्सना गोहत्रे, गिता लोखंडे, अनिता सोनोने, प्रतिभा इसळ, चैताली पाळतकर, प्रभा पाळतकर, गिता यादव, किरण धानुका, वर्षा निंभाळकर, सिंधु पारिसे, वनमाला आष्टोलीकर, मेघा जावरकर, रिया काळमेघ, पुजा पाटील, रेखा जावरकर, विना खोडके, बेबी भिडेकर, शितल पेठे, कांता साबळे, सिमा धांडे, नंदा खोब्रागडे, अलका नान्हे, चंदा हेरोडे, वैशाली राऊत, वंदना ठाकरे, कांचन वानखडे, पुनम ठाकरे, संगिता काळे, सविता शिवणकर, मिना खोडके, आरती यादव, कविता सोनपरोते, विद्या राऊत, वैष्णवी दहीहाांडे, सरला ढेंगळे, निर्मला विष्वकर्मा आदी सहीत सरस्वती नगर येथील महिला भगिनी या वेळी प्रामुख्याने उपस्थित होत्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code