Header Ads Widget

क्रीडा संकुलात स्थानिक युवकांना सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण

    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : आगामी काळात होणारी सैन्य भरती लक्षात घेऊन जिल्ह्यातील जास्तीत जास्त तरुणांचा समावेश व्हावा यासाठी तालुका क्रीडा संकुलांमध्ये विनामुल्य प्रशिक्षण शिबीर सुरु करण्यात येत आहेत. काही तालुक्यांमध्ये शिबीरांची सुरुवात झाली असून स्थानिक युवकांचा चांगला प्रतिसाद आहे.

    जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक तालुक्यांत ही शिबीरे सुरु करण्याबाबत आखणी करण्यात आली आहे. तहसीलदारांकडून तालुक्यांतील माजी सैनिकांच्या सहकार्याने तालुका क्रीडा संकुलांमध्ये काही तालुक्यांत शिबीरांना सुरुवात झाली. सैन्य भरतीत जिल्ह्याच्या टक्का वाढविण्यासाठी, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

    नागपूर येथे सप्टेंबर अखेरीस व ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर सैन्य भरती होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर चांदूर रेल्वे, वरुड, तिवसा, अंजनगाव सूर्जी आदी तालुक्यात शिबीरांना सुरूवात करण्यात येत आहे. चांदुर रेल्वे येथे शिबीरांला सुरूवात झाली असून 30 हून अधिक युवकांनी प्रशिक्षणात सहभाग घेतला आहे. शिबीरांमध्ये रनिंग, लांब उडी, पुलअप्स आदी शा‍रीरिक प्रशिक्षणाबरोबरच परीक्षेचा अभ्यासक्रम लक्षात घेऊन विविध विषयांची तयारी करून घेण्यात येत आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या