Header Ads Widget

श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाला नॅक समिती भेट देणार

    * चौथ्या पुनर्मुल्यांकनाकरीता महाविद्यालय सज्ज
    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : मध्यभारतातील एक अग्रगण्य महाविद्यालय तसेच एन.आय.आर.एफ या केंद्र सरकारच्या गुणांकन यादीत भारतातील पहिल्या दोनशे दर्जेदार महाविद्यालयात स्थान पटकविणारे सुप्रसिध्द विज्ञान महाविद्यालय म्हणून श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय सर्व परिचीत आहे.

    देशपातळीवर उच्च शिक्षणाचा दर्जा सुधारावा व संशोधन क्षेत्रात उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांनी महत्वाची भूमिका पार पाडावी या हेतूने देशपातळीवर नॅक नावाची संस्था आकाराला आली. गत तीन दशकांपासून उच्च शिक्षण देणाऱ्या संपूर्ण भारतातील संस्थांना भेटी देऊन त्यांचा सर्व अंगांनी अभ्यास व विश्लेषण करुन मुल्यांकन व गुणांकन केले जाते व महाविद्यालयाला अधिस्वीकृती बहाल करण्यात येते.

    याच प्रक्रियेचा एक भाग म्हणून आज पर्यंत सलग तीन वेळेस नॅक द्वारा 'अ' दर्जा संपादन केलेल्या श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाला नॅकची समिती येत्या 29 व 30 ऑगस्ट रोजी भेट देणार असुन महाविद्यालयास चौथ्यांदा अधिस्वीकृती बहाल करण्यात येणार आहे. चौथ्या नॅक मानांकनास सामोरे जाणारे श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय अमरावती हे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ परिसरातील पहिलेच महाविद्यालय होय.

    वरील त्री-सदस्यीय समिती सलग दोन दिवस महाविद्यालयाच्या सर्व शैक्षणिक आयामांचा आढावा घेऊन मानांकनाची प्रक्रिया पुर्ण करणार आहे. या भेटी दरम्यान महाविद्यालयाचे प्रशासन, विषय विभाग, शैक्षणिक सुविधा, भौतिक सुखसोयी, विविध अभ्यासक्रमांची रचना, विद्यार्थी केंद्रीत उपक्रम, संशोधन व प्रकाशन, संशोधन प्रयोग शाळा, तंत्रज्ञानावर आधारीत संगणक प्रणाली कृत शिक्षणाची सुव्यवस्था, क्रिडा विषयक सुविधा, पर्यावरण पुरक उपक्रम, सायन्स सेंटर, केंद्रीय संसाधन व उपकरण कक्ष, जिम्नेशियम, वनस्पतीशास्त्र उद्यान, जल संकलन संच, सौर उर्जा संच, वातावरणीय वायु गुणवत्ता मापन केंद्र, माजी विध्यार्थी व पालक या समवेत संवाद सक्षम अशा नानाविध प्रकल्पांच्या पातळीवर महाविद्यालयाचे गुणांकन होणे अपेक्षित आहे.

    या भेटीकरीता महाविद्यालयाचे कार्यक्षम युवा प्राचार्य डॉ. जि.व्ही. कोरपे यांच्या उपयुक्त मार्गदर्शनात सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता कक्षाचे समन्वयक डॉ. डब्ल्यु.एस. बरडे यांच्या नेतृत्वात महाविद्यालयाने संपूर्ण तयारी करुन ठेवली आहे.श्री शिवाजी शिक्षण संस्थेची सन्माननीय कार्यकारिणी व व्यवस्थापनाचे प्रमुख तथा अध्यक्ष माननीय श्री. हर्षवर्धनजी देशमुख यांच्या निगराणीखाली व योग्य मार्गदर्शनात महाविद्यालय जय्यत तयारीने सुसज्ज झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या