Header Ads Widget

क्रिष्णलीला

    कंस......क्रिष्णाचा कर्दनकाळ.प्रत्यक्ष त्याचा सख्खा मामा.पण त्याने आपल्या सख्ख्या सहा भागिनेयला का मारले असावे ही विचार करणारी बाब आहे.तशी रक्तरंजितही.मुळात राक्षसी वृत्तीचा असलेला कंस.आपल्या बहिणीने वासुदेवाशी प्रेमाने विवाह केलेल्या बहिणीचा विवाहरथ हाकत असतांना आकाशवाणी झाली,"हे कंसा,तु कोणाचा रथ हाकतोय.जिच्या पोटचा आठवा गर्भ तुझाच वध करणार आहे." सगळा डाव......राक्षसी वृत्तीच्या कंसाला संपविण्याचा.राक्षसी वृत्ती नष्ट करण्याचा डाव नाही तर माणूसच संपविण्याचा डाव.आपण आठवा मुलगा मारू.त्या आठव्या मुलाच्या वधासाठी एवढे भागिनेय का मारावे?कंसाचा त्यावर विचार.त्यातच पुन्हा भविष्यवाणी "कदाचित देवकीच्या आठव्या मुलाने पहिल्या पोराच्या वेळीच जन्म घेतला तर...." त्यातच देवकीचा आठवा पुत्र पहिल्याच मुलांच्या वेळी त्याचा जन्म झाला तर......कंसाच्या मनात सारखा विचार येत होता.कोणाला मृत्यूचे भय नाही.ते भय कंसालाही होते.यातूनच राग येवून कंसाने बहिण देवकी व वासूदेवाला कैदेत टाकले.साधी कैद नाही तर नजरकैद.मग कंस आपली बहिण गरोदर असल्याचे समजताच तिची देखभाल करायचा नव्हे तर पहारेक-यांमार्फत बारीक लक्ष ठेवायचा.जेव्हा बाळ जन्मायचं,तेव्हा त्याला नवीन कपडे घालून ठार करायचा.असे सहा पुत्र देवकीचे,देवकीच्या डोळ्यासमोर कंसाने ठार केले.मात्र क्रिष्ण व बलरामाला तो ठार करु शकला नाही.कंसाला जेव्हा माहीत झालं की आपल्या बहिणीचा सातवा व आठवा गर्भ जीवंत आहे व तो गोकुळात आहे.त्याने त्या बाळाला ठार करण्यासाठी कागेसन,पुतना,बकासूर इत्यादी राक्षसांना पाठवले.पण धिप्पाड शरीराच्या या राक्षसांना क्रिष्णाने केवळ युक्तीने ठार केले.

    अंगूलीवर उचललेला गोवर्धन,कालियामर्दन,तसेच पुतनेचा वध या गोष्टी क्रिष्णाच्या लीलेला शोभण्यासारख्या असल्याने त्यात चमत्कार दिसतो.पण त्यात चमत्कार होता की नव्हता हे आम्ही वास्तविक जीवनात जगणारी मंडळी सांगू शकत नाही.कोणी तर म्हणतात महाभारत घडलेलंच नाही.ती एक दंतकथा आहे.पण ती जरी दंतकथा असली तरी आजच्या वास्तविक जीवनात या दंतकथेपासून ब-याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत.आम्ही त्या काळातील या क्रिष्णलीलांना चमत्काराची जोड दिली असली तरी वास्तविक जीवनात क्रिष्णजन्म दंतकथा वाटत नाही.

    क्रिष्ण जन्म मुळात रक्तरंजितेने सजलेला आहे.केवळ राक्षसी वृत्तीचा कंस......त्याने आपल्या बहिणीचा रथ हाकलला.पण आकाशवाणीच्या या तडाख्यात कंसाचे जीवन पार बदलून टाकले.कंसवध करणे म्हणजे राक्षसवृत्तीचा अंत करणे,त्याला जसा क्रिष्ण जीवंत असल्याचं माहीत झालं.तसा तो अधिक संतापत असे व क्रिष्णाला मारायला राक्षसावर राक्षस पाठवित असे.तरीही क्रिष्ण वाचल्याने तो अधिकच संतापत असे.

    समाजात कोणत्याही गोष्टीचे दोन भाग पडतात.एक चीत भाग व दुसरा पट भाग.चीत अर्थात सत्य आणि पट अर्थात असत्य.जन्म झाल्यानंतर मृत्यू येणारच.तो कितीही थांबवला तरी थांबत नाही.परीवर्तन काळाची गरज आहे.जेव्हा पर्यंत माणूस मरत नाही,तेव्हापर्यंत नवीन जन्म होत नाही.समतोलपणा हा सृष्टीचा नियम.तो तोडून कसा चालेल.इथे जेवढी वाईट माणसं आहेत.तेवढीच चांगलीही माणसं आहेत.कंस दरबारी जरी वाईट वृत्तीची माणसं असली तरी अक्रुरसारखी चांगली माणसंही होती.

    क्रिष्णाची लीला सांगायची झाल्यास कालियाचा दंश वाचवून त्याच्या फणीवरच चढून थयथय नाच करणारा क्रिष्ण.त्याच्या पायाच्या वज्राने कालियाला शरण आणले.तसेच आपल्यावर जीव लावणा-या रुख्मीनीला क्रिष्णाने पळवून आणले.ही एक मदतच होती.कारण रुख्मीनीसारख्या नाजूक कन्येला गुंडाच्या तावडीत न सापडू देणे हा क्रिष्णाचा उद्देश होता.म्हणून वेळप्रसंगी त्याला पळवून आणावं लागलं.तसेच जरासंघाच्या कुटील आक्रमणानं त्रस्त होवून आपल्या राजेरजवाड्याच्या भांडणात जनतेचं नुकसान होवू नये म्हणून क्रिष्णाने द्वारकेची निर्मीतीच समुद्रात केली.ही द्वारकेची निर्मीती आजच्या समुद्रावर बांधलेल्या सिंधुदुर्ग व विजयदुर्गसारखीच आहे.एवढंच नाही तर इंद्राचा अहंकार नष्ट करण्यासाठी अंगूलीवर उचललेला गोवर्धन हे ही क्रिष्णलीलेचं उत्कृष्ट उदाहरण.एवढंच नाही तर या क्रिष्णाने शिशुपालाचे शंभर गुन्हे माफ करुन एकशे एक व्या गुन्ह्यात त्याचा वध केला यावरुन वर्तमानात कोणाचेही तेवढेच ऐका,जेव्हापर्यंत सहन होते.जेव्हा सहन होत नाही,तेव्हा प्रतिकार करा हा बोध मिळतो.आधुनिक काळ हा गुंडाचा काळ आहे.जिथे जावे तिथे गुंडेगिरीचा सामना करावा लागतो.अशावेळी या गुंडांनाही सबक कसा शिकविता येईल यासाठी ही क्रिष्णलीला कामी पडते.पण एखाद्याला वाटेल की क्रिष्णाने अशी कोणती लीला केली शिशुपालाला मारुन.ती तर हिंसा होती.त्याचा आजच्या काळात कोणता उपयोग? महत्वाचं म्हणजे एखाद्या स्रीवर एखादा पुरुष सतत अत्याचार करीत असेल,तर तो अत्याचार तिने शेवटपर्यंत सहन करु नये असा बोध शिशुपालाच्या वधातून मिळतो.मुळात ही क्रिष्णलीला ताकद,हिंमत,संयम शिकविते हे आपण लक्षात घ्यायला हवे.

    मित्रप्रेमाचे उदाहरण द्यायचे झाल्यास सुदाम्याची व क्रिष्णाची मैत्री वाखाणण्याजोगी आहे.सुदामा गरीब असूनही क्रिष्णाने त्याला अंतर पडू दिले नाही वा अंतर भासू दिले नाही.मित्रप्रेमासाठी सुदामनगरी बनवली तर राधेवरील मित्रप्रेमासाठी वृंदावन, दुर्योधनाचे म्हणण्यानुसार ते सत्यावर असत्याचं युद्ध लादू पाहात आहेत,हे माहीत असूनही दुर्योधनाला सैन्याची केलेली मदत........राग मनात असूनही संयम बाळगत रागावर नियंत्रण कसं ठेवावं हे ही क्रिष्ण शिकवतो नव्हे तर क्रिष्णाला द्रौपदीचा झालेला व कौरवांनी भर दरबारात अधर्म बाळगलेल्याचा दाखला मनात ठेवून या क्रिष्णाने या अधर्माचा नाश करण्यासाठी असत्याचाही आधार घेतला,नव्हे तर एक तत्व मांडलं की सत्य बाहेर आणण्यासाठी बोललेलं असत्य हे असत्य नसतं.आजही न्यायालयात अशाच प्रकारचे खटले चालतात.खटले निकाली काढतांना त्या खटल्यात पुरावे तपासले जातात.काही मानवसदृश पुरावे असत्यही बोलतात.त्यात चांगल्या माणसांचे बळी जातात.पण एकही वाईट माणूस मात्र त्यातून सुटत नाही.महाभारतातील युद्धात पितामहा भीष्म,द्रोण,कर्ण,कृपाचार्य हे वीर योद्धे असून त्यांना कोणीही हरवू शकणार नव्हते.अशावेळी त्यांच्या कमजोरीचा फायदा घेवून जे काही करायला पांडवांना क्रिष्णाने बाध्य केलं.तो क्रिष्णाने केलेला अधर्म असला तरी त्याला अधर्म न मानून केलेलं कृत्य क्रिष्णलीलेचाच एक भाग आहे.प्रेमाच्या बाबतीत विचार केल्यास प्रेम करा पण त्या प्रेमात वासना नको तर मदत करण्याची वृत्ती जणू क्रिष्ण राधेचे प्रेम आणि राधेसाठी उत्पन्न केलेलं वृंदावन.

    क्रिष्णलीलेची उदाहरणं भरपूर आहेत.द्रौपदीला साडी पुरविणारा क्रिष्ण अर्थात बहिणीची मदत करणारा भाऊराया या क्रिष्णाने साकारला आहे,नव्हे तर शत्रूलाही मित्र मानणारा क्रिष्ण हा काही एखाद्या देवदूतापेक्षा लहान नाही.क्रिष्ण हा माणुसच होता आपल्यासारखा.पण त्याच्या वेगवेगळ्या लीलांनी तो देवच वाटतो.क्रिष्णाचे बालपण असो की क्रिष्णाचे तरुणपण असो,क्रिष्णाने वेळप्रसंगी आपल्या लीला दाखवल्या.आजही त्या लीला आपल्या उपयोगात येतात.क्रिष्णाच्या बासुरीने मंत्रमुग्ध होणारी जनावरं.कला जोपासा पण ती मनापासून जोपासा.त्यात चालढकलपणा नको हेही क्रिष्ण शिकवून जातो.नव्हे तर आपल्या गोकुळातले दही दूध मथुरेला जावू नये.ते आपल्या गोकुळच्या लोकांना मिळावे म्हणून ते माठ फोडणारा क्रिष्ण संदेश देतो की आपल्या देशाचा माल देशातच विका.देशातीलच स्वदेशी बनावटीच्या वस्तू वापरा.विदेशी लोकांच्या वस्तू वापरू नका.आज चीनचा माल भारतात येत आहे.त्याचबरोबर घातक रसायनेही भारतात येत आहे.काल जेव्हा दुष्काळ पडला होता.तेव्हा गाजर गवत लालगुंजीच्या आयातीतून देन म्हणून भारताला मिळाली.आज घातक बिमा-या.गाजरगवत पीकांचा शत्रू......पीक होवू देत नाही.तर आज चीनचे मोबाईल माणसांचे शत्रू.डोळ्यापासून तर डोक्यापर्यंतचे आजार.काल व्यापार लादण्यासाठी इंग्रज आले.दिडशे वर्ष राज्य करुन गेले.आज चीन येतोय..खरंच क्रिष्णलीला ही तमाम भारतीयांनो सावध व्हा असा संदेश देते.पण त्या गोष्टी आपण समजून घेण्याची गरज आहे.अन्यथा भारताचं सार्वभौमत्व धोक्यात येवू शकते.

    क्रिष्ण जरी दह्यांचं चौर्य कर्म करीत असला तरी ते चौर्यकर्म नव्हतं.तुटपुंजे पैसे कमविण्यासाठी आपल्या लहानग्या बाळालाही ज्या महिला दही वा लोणी देत नव्हत्या.ते लोणी बाळाला देण्यासाठी या महिलांनी बाध्य व्हावं यासाठी ते चौर्य कर्म होतं. खरंच क्रिष्णलीलेत वास्तविकता आहे.आपण आजही क्रिष्णदृष्टीकोण अंगीकारावा असाच आहे.आजची पिढी मात्र क्रिष्णलीला मानत नाही.सर्रास गुन्हे करीत आहेत.कोणावर बलत्कार करीत आहे.केवळ शरीराचाच बलत्कार नाही तर मानसिकही बलत्कार करीत आहेत.बोलण्यातूनही चांगल्या माणसांची मनं दुखावत आहे.राजगादी साठी भांडणं होतात आहे.राजनेते कार्यकर्त्यांची लढाई जुंपवत आहेत.स्वतः मात्र टाळूवरचे लोणी खात आहेत.क्रिष्णाने राजगादी पाहिली नाही.कंस वधानंतर त्यांना हवं तर मथुरेची गादी भेटत होती.पण त्या क्रिष्णाने ती नाकारली व स्वतः आपले आजोबा उदयभानाला राजगादीवर बसवले.अर्थात राजगादीचा लोभ करु नका हाही संदेश क्रिष्णाने दिलेला आहे.

    क्रिष्णाने आपल्याला आजच्या जगात जगण्यास्तव ब-याच गोष्टी सांगितल्या.आपण कितपत त्या गोष्टीचा उपभोग घेतो हे आपल्यावरच अवलंबून आहे.तेव्हा तो निर्णय आपला आहे.एक मात्र नक्कीच की क्रिष्णलीलेत जीवन जगण्याचे सार दडले आहे.ते आपण नक्कीच शोधावे एवढंच शेवटी म्हणावेसे वाटते.!

    -अंकुश रा.शिंगाडे
    ९३७३३५९४५०

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या