वरुड तालुका प्रतिनिधी: तालुक्यात मागील आठ दिवासापासून सततधार पावसामुळे संपूर्ण तालुक्यासह ग्रामीण भागातील नागरीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांची उभी पिभी पिके पुर्णत: नष्ट झालेली आहेत तर नागरीकांच्या घरांची पडझड होऊन मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीचे सर्व्हेक्षण करुन नुकसानग्रस्त नागरीकांना तातडीणे नुकसान भरपाई देण्याची मागणी निवेदनाद्वारे राष्ट्रवादी चे माजी तालुका युवक अध्यक्ष तसेच माजी जिल्हा उपाध्यक्ष रोषण दारोकर यांनी तहसील दारांकडे केली आहे.
अतिवृष्टीमुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून नागरीकांच्या घरांची मोठ्याप्रमाणात पडझड होऊन जिवणावश्यक वस्तू संपूर्णत: वाहून गेले आहे. शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी विवंचनेत सापडला आहे. करीता शासनाने तात्काळ पंचानामे करुन प्रती हेक्टरी १ लक्ष रुपये देण्यात यावे तसेच पूरग्रस्तांना व पुरात वाहून गेलेल्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. तालुक्यात ७ ऑगस्ट पासून ११ ऑगस्ट २०२२ पर्यंत झालेल्या सतत च्या पावसामुळे नदीकाठची शेती पूर्णत: खरडून गेली असून शेतकऱ्यांनी पेरणी केलेलं पीक सुद्धा संपूर्णत: खराब झालं आहे.
करीता शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी सरसकट 1 लक्ष रुपयांची आर्थीक मदत देण्यात यावे, नदी पात्राच्या बाजूला असणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसून शेती पिकासह पूर्णत: वाहून गेली. अश्या सर्व शेतकऱ्यांना शासनाकडून विशेष पॅकेज जाहीर करण्यात यावे, वरुड तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पाणी शिरून जी घरे उध्वस्त झालीत त्या संपूर्ण कुटूंबांना ५ रुपये लक्ष प्रति कुटुंब मदत देण्यात यावे किंवा शासकीय योजेत सविष्ठ करुन पक्के घर देऊन १ लक्ष रुपये सानुग्रह अनुदान देण्यात यावे,ज्या कुटुंबातील व्यक्तीचा नदीच्या पुरात दुर्देवीपणे वाहून मृत्यू झाला अशा कुटुंबाला नैसर्गीक आपत्ती निवारण अतर्गत नियमानुसार विनाअट १० लक्ष रुपये प्रती कुटूंब आर्थीक मदत देण्यात यावी इत्यादी मागण्या निवेदनातून तहसिलदरांकडे करण्यात आलेल्या आहेत. निवेदन देतेवेळी संजय चक्रपाणी, राजू शिरस्कर, जगबीरसिंग भावे, गणेश चौधरी, अक्षर डांगोरकर, श्रीकेश पडोळे, शिवदास भंडारी, राजेंद्र लाड आदींसह असंख्य पुरग्रस्त शेतकरी व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या