Header Ads Widget

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ; ‘पीडब्ल्यूडी’ तर्फे शुक्रवारी रक्तदान शिबिर

    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे शुक्रवारी (12 ऑगस्ट) सकाळी 10 वाजता रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता सुनिल थोटांगे यांनी आज दिली.

    मुख्य अभियंता गिरीश जोशी व अधिक्षक अभियंता अरुंधती शर्मा यांची यावेळी उपस्थिती असेल. विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी व बांधकाम कंत्राटदार शिबिरात सहभागी होतील. यावेळी इच्छुकांनी रक्तदान करणाचे आवाहन श्री थोटांगे यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या