Recent in Technology

Advertisement

Breaking News

आभायातल्या देवा

    अरे आभायातल्या देवा
    तुवा असं कसं केलं
    माह्या कर्माच रे सारं
    कसं पाणी पाणी झालं !!
    बैलापरी बैलासंगे
    राब राबलो रानात
    हाता तोंडाचा रे घास
    कसा गेला रे मातीत !!
    आस कसं रे चुकलं
    पावसाचं रे तंतर
    तुह्या रे आभायातून
    कशी कोसयते धार !!
    धान, बाजरी, जोंधळ
    पिकं गेलं रे वाहून
    बळीराजाच सपान
    तुवा नेलं रे चोरून !!
    कसा वाचू तुह्या म्होरं
    माह्या संकटाचा पाढा
    सांग कसा रे चालवू
    माह्या संसाराचा गाडा !!
    देवा आवर प्रकोप
    थांबो निसर्गाचा ऱ्हास
    चिल्यापिल्याच्या रे मुखी
    पडू देरे चार घास !!
    -वासुदेव महादेवराव खोपडे
    सहा पोलीस उपनिरीक्षक (सेवानिवृत्त)
    अकोला 9923488556

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code