अमरावती (प्रतिनिधी) : अमरावती मध्यवर्ती कारागृहातील शिक्षा बंदीच्या मृत्यूच्या घटनेविषयी माहितगार व्यक्तींनी माहिती देण्याचे आवाहन तिवसा-भातकुलीचे उपविभागीय दंडाधिकारी तथा चौकशी अधिकारी यांनी केले आहे.
शिक्षाबंदी क्र. 5869, शेख हुसेन शेख मेहबुब कुरेशी (वय 42), रा. यवतमाळ ता. जि. यवतमाळ यांचा दि. 9 फेब्रुवारी 2022 रोजी रात्री 11 वाजून 5 मिनिटांनी जिल्हा सामान्य रूग्णालय, अमरावती येथे मृत्यू झाला.
या चौकशीत कैदी मयत होण्याचे कारण काय, कैदीचे मृत्यूपूर्व स्वास्थ्य कसे होते, कैदीला मारामारी होऊन मृत्यू झाले किंवा कसे, पोलिसांनी कोणती भूमिका बजावली, वैद्यकीय उपचाराचे कागदपत्रे व व्हिसेरा अहवाल आदी बाबी तपासण्यात येणार आहेत. ज्यांना या घटनेसंबंधी माहिती द्यावयाची आहे, त्यांनी वस्तुस्थितीदर्शक माहिती व आवश्यक कागदपत्रांसह तिवसा-भतकुली उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयात कार्यालयीन वेळेत समक्ष माहिती सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या