अमरावती (प्रतिनिधी) : दिनांक २२/०८/२०२२ रोजी दक्षिण झोन क्र.४ बडनेरा प्रभाग क्रमांक २० सूतगिरणी अंतर्गत येणा-या परिसरात जेष्ठ स्वास्थ निरीक्षक राजु डिक्याव यांचे सोबत पाहणी करून सितारामबाबा कॉलनी, चक्रधर नगर, कैलास नगर, मुंगसाजी माऊली परिसरातील साफ सफाई करण्यात आली.
नंदनवन कॉलनी, गुरुकृपा कॉलनी, धनराज नगर, विजय नगर परिसरात स्प्रे फवारणी व धुवारणी करण्यात आली. पावसाळ्याचे दिवस लक्षात घेता प्रभागामध्ये नागरीकांच्या घरोघरी डेंग्यू आजाराबाबत जनजागृती करुन हस्तपत्रके वाटप करण्यात आले. तसेच कचरा गाड्यांवर डेंग्यु आजाराबाबतची ऑडियो क्लिप वाजविण्यात आली व परिसरातील खुल्या जागेवरील केरकचरा, कंटेनर परिसराची साफ सफाई करण्यात आली.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या