Header Ads Widget

अमरावतीच्या सुपुत्राने आयटी तंत्रज्ञानातून घडविली नव उद्योगाची क्रांती

  * दिव्य आयटी सोल्युशनचे सुमेध रामटेके व सौ. सुप्रिया रामटेके यांचा राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या हस्ते गौरव
  * सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी सोहळ्यात विशेष पुरस्काराने सन्मान
  गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

  अमरावती (प्रतिनिधी) : ज्ञान, कौशल्य व तंत्रज्ञानाला जेव्हा उद्योगाची जोड मिळते,तेव्हा नव उद्योजक घडविल्या जाते. शिक्षण, प्रशिक्षण व उद्योगाची सांगड घातल्यास नव्या औद्योगिक व आर्थिक विकासाला गतिमानता येते. नेमका हाच अविष्कार साकारून आपल्या आयटी तंत्रज्ञानातून नव उद्योगाची क्रांती घडविणारे अमरावतीचे सुपुत्र दिव्य आयटी सोल्युशनचे डायरेक्टर सुमेध उद्धवराव रामटेके व सीईओ सौ. सुप्रिया सुमेध रामटेके यांना शिक्षण व उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल राज्याचे महामहिम राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या हस्ते विशेष पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.

  भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे येथे झालेल्या भव्य दिव्या अशा दिमाखदार सोहळ्या प्रसंगी पुणेचे खासदार श्री. गिरीश बापट, सावित्री बाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे,संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांच्या सह मान्यवर मंडळी तसेच पुणे विद्यापीठाचे सर्व विभाग प्रमुख व शिक्षण व उद्योग क्षेत्रातील तज्ञ मंडळी, तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

  "तुम्ही करत असलेले कार्य या देशाच्या औद्योगीक व आर्थिक विकासासाठी अत्यावश्यक आहे. या शब्दात महामहिम राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी सौ. सुप्रिया रामटेके व श्री सुमेध उद्धवराव रामटेके यांचे कौतूक करून शुभेच्छा दिल्या तर दिव्य आयटी सोल्यूशन्स ने शिक्षण व उद्योग या मधील दरी दूर करून भारतीय अर्थक्रांती मध्ये भरीव कामगीरी केली असल्याचे सांगत पुण्याचे खासदार श्री. गीरीष बापट यांनी विशेष अभिनंदन केले.

  मुळचे अमरावती स्थित किशोर नगर येथील रहिवासी असलेले सुमेध उद्धवराव रामटेके यांनी दिव्य आयटी सोल्यूशन्स च्या माध्यमातून डेटा सायन्स, क्लिनीकल रिसर्च, इलेक्ट्रिकल मोबिलीटी, इंडस्ट्री 4.0 यासारख्या अद्यावत तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण व त्यासाठी लागणारे प्रयोगशील उपकरणे बनवून हजारो विद्यार्थ्यांना नोकरी उपलब्ध करून अनेक यशस्वी उद्योजक घडविले आहेत. त्यांचा हा नवा अविष्कार आजच्या बेरोजगारीला उद्योजकतेकडे नेणारा असल्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने त्यांना विशेषरित्या नियुक्त करीत जबाबदारी दिली. तर दिव्य आयटी सोल्युशन्सने इंटरनेट ऑफ थिंग अँड ऑटोमेशन चे सेंटर ऑफ एक्सलेन्स चे सेंटर ऑफ गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावती येथे प्रस्थापीत करून बरेच विद्यार्थी या सुविधेचा सद्या लाभ घेत आहेत. त्यामुळे अमरावतीच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा आजच्या युगातील प्रगत व अद्यावत तंत्रज्ञान व कौशल्य विकसीत करून अमरावतीची शान वाढविली आहे. दिव्य आयटी सोल्युशन चे डायरेक्टर सुमेध रामटेके व सीईओ सौ. सुप्रिया सुमेध रामटेके यांनी आयटी क्षेत्रात विकसित केलेले नवनवे तंत्र युवकांना उद्यमशीलतेकडे नेणारे असल्याने आज त्यांचे अनेक अविष्कार हे विकासाचे नवे रोल मॉंडेल ठरू पाहत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या