अमरावती (प्रतिनिधी) : प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभागाच्यावतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त सामाजिक न्याय भवन परीसरातील अभ्यासिकेच्या विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्व विकास व संवाद कौशल्य या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त सुनील वारे, प्रमुख मार्गदर्शक प्रो. प्रशांत तायडे, सहाय्यक आयुक्त माया केदार, समाज कल्याण अधिकारी राजेंद्र जाधवर, लिडकॉम व्यवस्थापक भागवतकर आदि उपस्थित होते.
सुनील वारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. श्रीमती माया केदार यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेच्या अनुषंगाने कशा पध्दतीने तयारी करावी या विषयी माहिती दिली. या प्रसंगी अभ्यासिकेच्या विद्यार्थ्यांमधील राहुल कांबळे, हा विद्यार्थी MPSC कंबाईन ग्रुप B,MPSC ग्रुप C या परिक्षांमध्ये उत्तीर्ण झाला, मंसूर अली हा विद्यार्थ्यां MPSC ग्रुप C या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाला. SSC, CGI पुर्व परीक्षा उत्तीर्ण झालेले शुभम मोहोड, सिध्दांत मोहोड, रिषभ सरदार, मनिष वानखेडे या विद्यार्थ्यांचा शॉल व श्रीफळ मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक राजेंद्र जाधवर यांनी केले. कार्यशाळेस अभ्यासिकेचे विद्यार्थी, सहाय्यक आयुक्त कार्यालयाचे कर्मचारी व समतादुत उपस्थित होते.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या