Header Ads Widget

राखीचा रे सण...

    नको समजू रे दादा
    फक्त सुताचा हा धागा
    नात रक्ताच प्रेमाच
    बोले दारावरी कागा !
    बोले दारावरी कागा
    सण राखीचा ग आज
    गाव वेशिला पाव्हन
    आल घरा बंधुराज !
    आल घरा बंधुराज
    त्यास करिते औक्षण
    करा बांधूनिया राखी
    त्यास मांगते रक्षण !
    त्यास मांगते रक्षण
    भाऊ बहिन नात्याचे
    सुखी सासर माहेर
    सदा कपाळ कुंकाचे !
    सदा कपाळ कुंकाचे
    साऱ्या आया बाहिनींचे
    दादा राख तू रे मोल
    ह्याच अमोल धाग्याचे !
    ह्याच अमोल धाग्याचे
    आज बांधावे बंधन
    बोले दारावरी कागा
    आज राखीचा रे सण !
    वासुदेव महादेवराव खोपडे
      सहा पोलीस उपनिरीक्षक (सेनी)
      अकोला 9923488556

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या