- गौरव प्रकाशन वृत्तसंकलन
अमरावती (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने ‘ मधाचे गाव ‘ संकल्पने नुसार निवडलेल्या चिखलदरा तालुक्यांतील आमझरी गावात ‘ हर घर तिरंगा ‘ उपक्रमाचा भाग म्हणुन प्रत्येक घरी तिरंगा वाटप करण्यात आला.
तसेच आज सकाळी जि.प.शाळेतील विद्यार्थी , शिक्षक , ग्रामस्थ , खादी व ग्रामोद्योग विभाग आणि वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांचे उपस्थितीत आमझरी गावात तिरंगा रॅली काढण्यात आली. त्यानंतर प्रत्येक ग्रामस्थाने आपआपल्या घरावर तिरंगा ध्वज उभारला. विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पासुन नजिक डोंगरांच्या पायथ्याशी वसलेल्या आमझरी या सुंदर निसर्गरम्य गावाच्या प्रत्येक घरावर पुढील तिन दिवस भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा दिमाखात फडकणार आहे.
मेळघाटच्या जंगलातील मधमाशांचे संरक्षण व संवर्धन , स्थानिक आदिवासी बांधवांना रोजगार व पर्यटन विकासाच्या उद्देशाने खादी व ग्रामोद्योग विभागामार्फत 'मधाचे गाव' संकल्पना राबविण्यात येत आहे.
0 टिप्पण्या