अमरावती (प्रतिनिधी) : महानगरपालिका उर्दु उच्च प्राथमिक शाळा क्र.१ नागपुरी गेट येथे “आझादी का अमृत महोत्सव” “हर घर तिरंगा” या उपक्रमाबाबत पालक सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेमध्ये शिक्षणाधिकारी डॉ.अब्दुल राजीक यांनी नागरिकांना मार्गदर्शन केले.
शिक्षणाधिकारी डॉ.अब्दुल राजीक यांनी सांगितले की, “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” अंतर्गत “हर घर तिरंगा” उपक्रमाची घराघरात जागृती करावी. भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर “हर घर तिरंगा” हा उपक्रमाअंतर्गत निबंध स्पर्धा, वत्कृत्व स्पर्धा व इतर स्पर्धेचे आयोजन करावे.
या सभेमध्ये मुख्याध्यापक मेहमुद अहेमद, जफरउल्लाह खान, सहाय्यक शिक्षक मोहम्मद शाकीर, फरीदा यास्मीन, नाजेमा तहेसिन, शैहला अंजुम, उजमा कौसर तसेच एस.एम.सी. अध्यक्ष सुमय्या परवीन उपस्थित होते.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या