Translate

Gaurav Prakashan

Recent in Technology

Advertisement

Breaking News

"देता की जाता" या राज्यव्यापी आदिवासी मोर्चात दिलेल्या वचनाची पूर्ती करावी

    * कोळी समाज महामोर्चाचे उपमुख्यमंत्र्यांना आवाहन
    * महासचिव उमेश ढोणे यांनी विभागीय आयुक्तांमार्फत दिले देवेंद्रजी फडणवीसांना निवेदन

    अमरावती, : "देता की जाता" या राज्यव्यापी आदिवासी मोर्चात दिलेल्या वचनाची पूर्ती करावी, असे आवाहन कोळी समाज महामोर्चातर्फे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करण्यात आले आहे. तसे निवेदन महामोर्चाचे महासचिव उमेश ढोणे यांनी डॉ. दिलीप पांढरपट्टे विभागीय आयुक्तांमार्फत निवेदन दिले आहे. अन्यायग्रस्त अनुसुचित जमाती महाराष्ट्र राज्य कृती समिती यांनी राज्याचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केलेल्या मागणीचे निवेदन दि.१८ ऑगस्ट रोजी अमरावती विभागीय आयुक्त दिलीप पांढरपट्टे यांच्याकडे सोपविण्यात आले.

    श्री. फडणवीस हे राज्य विधीमंडळाचे विरोधी पक्षनेते असतांना मुंबई येथे सोमय्या मैदानावर राज्यव्यापी कोळी समाजाचे महामोर्चामध्ये मंचकावर उपस्थित राहून तेव्हा उमेश ढोणे यांनी सवलती निर्णय घेण्यासाठी निवेदन सादर केले होते. "देता कि जाता" या कोळी महादेव आदिवासींच्या या मोर्चाला सबोंधित करून अन्यायग्रस्त आदिवासी संबंधी निर्णय आम्ही सत्तेत आल्यावर घेऊ असे आश्वासन या मोर्चाला देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते.

    आज ते राज्याचे उप मुख्यमंत्री आहेत तसेच महाराष्ट्र भाजपाचे प्रमुख नेते आहेत त्यांनी कोळी महादेव जमाती संबंधी महाराष्ट्र राज्य सरकारने निर्णय घ्यावा अशी मागणी चे निवेदन उमेश ढोणे महाराष्ट्र राज्य कृती समितीने वतीने आज विभागीय आयुक्तांकडे सोपविले. विशेषत: देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत जे-जे भाजपाचे आमदार तेव्हा मंचकावर उपस्थितीत होते. ते सुद्धा आज सरकारमध्ये मंत्री आहेत त्यांनी सुद्धा वरील विषयासंबंधी निर्णय घेण्यासाठी मागणी राज्य सरकारच्या कडे लावून धरावी अशीही मागणी उमेश ढोणे यांनी दिलेल्या निवेदनातून केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code