Header Ads Widget

लबाडाच आवतन

  मी खोटं नाही सांगत
  लिहितोय खरंखुरं
  लबाडाच आवतन
  जेवल्यावरच खरं !!
  लाख देऊ माफ करू
  देऊ फुकटच सारं
  लालसेचा लॉलीपॉप
  ठेवतात हातावर !!
  लबाडाच आवतन
  जेवल्यावरच खरं !!
  पाणी नळ विजेसह
  म्हणे देऊ आम्ही घर
  अजून राहातो आम्ही
  झोपडी,फुटपाथवर !!
  लबाडाच आवतन
  जेवल्यावरच खरं !!
  खोटं बोला रेटून बोला
  बोलतात सारे खरं
  जनतेस लुटुनिया
  भरती आपले घरं !!
  लबाडाच आवतन
  जेवल्यावरच खरं !!
  म्हणे गरिबी हटवू
  देऊ सर्वा रोजगार
  कमी करू महागाई
  करू रामराज्य सारं !!
  लबाडाच आवतन
  जेवल्यावरच खरं !!
  आश्वासनाची खैरात
  लावती बाभळीले बोरं
  वांझोटिले म्हणतात
  बाई होतील तुले पोरं !!
  लबाडाच आवतन
  जेवल्यावरच खरं !!
  ओठी काही पोटी काही
  यांच सारं काही न्यार
  गोड बोलून करती
  तुमच्या पाठीत वार !!
  लबाडाच आवतन
  जेवल्यावरच खरं !!
  नोका ठेऊ हो भरोसा
  तुम्ही यांच्या बोलण्यावर
  एकमेकांचे मावसभाऊ
  सारेच आहेत चोर !!
  लबाडाच आवतन
  जेवल्यावरच खरं !!
  म्हणून म्हणतो बाबू
  नको राहू गाफील बरं
  नको विकू तू स्वताले
  पैसा,हड्डी,पावटीवर !!
  लबाडाच आवतन
  जेवल्यावरच खरं !!
  -वासुदेव महादेवराव खोपडे
  सहा पोलीस उपनिरीक्षक (सेवानिवृत्त)
  अकोला 9923488556
  (Images Credit : Prabhasakshi)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या