- * विद्यार्थ्यांनी प्रश्नमंजूषा स्पर्धेत सहभागी होऊन वाहिली आदरांजली
- गौरव प्रकाशन वृत्तसंकलन
अमरावती (प्रतिनिधी) : श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टद्वारा संचालित तक्षशिला महाविद्यालय येथे नुकतेच ग्रंथालय शास्त्राचे जनक पद्मश्री डॉ. एस.आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त प्रश्नमंजूषा स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन त्यांना आदरांजली वाहिली.
महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागातर्फे वाचकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी नेहमीच नामवंत व्यक्तिमत्त्वाचे कार्यक्रम घेतले जातात. यावेळी प्रा.पी.आर.एस.राव, (सचिव, श्री दा. ग. चॅ. ट्र.) हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्था तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अंजनकुमार सहाय यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाला विविध विद्याशाखांतील अनेक विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी बोलतांना कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांनी वाचन संस्कृतीचे महत्व पटवून दिले. मोबाईल फोन आणि कॉम्प्युटरच्या जमान्यात विद्यार्थ्यांच्या कमी वाचनाच्या सवयीबद्दलही त्यांनी चिंता व्यक्त केली. इतर स्त्रोतांपेक्षा पुस्तके नेहमीच अधिक विश्वासार्ह आणि वास्तविक माहितीचा स्रोत असल्याचे सांगितले. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांनी ग्रंथालयातील प्रत्येक पुस्तक शेवटच्या वाचकापर्यंत पोहोचले पाहिजे, लायब्ररीचा प्रवेश वापरकर्त्यांना अनुकूल असावा असा आग्रह धरला. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची सवय लावण्यासाठी वेळोवेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे, याची आठवण त्यांनी करून दिली.
त्यानिमित्त विद्यार्थ्यांसाठी "सामान्य ज्ञान चाचणी" घेण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन व आभार ग्रंथपाल डॉ.प्रणाली पेठे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उमेश अरगुलेवार आणि राजरतन सुरवाडे यांनी सहकार्य केले.
0 टिप्पण्या