Header Ads Widget

आ. रोहितदादा पवार यांची आ.सौ. सुलभाताई संजय खोडके यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

    * खोडके यांच्या नेतृत्वात अमरावती जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्षाला नवी बळकटी
    * राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला निर्धार
    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : रविवार दिनांक २१ ऑगस्ट २०२२ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते व कर्जत-जामखेड( जिल्हा-अहमदनगर) येथील विद्यमान आमदार रोहितदादा पवार यांनी आमदार सौ. सुलभाताई संजय खोडके यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.

    यावेळी आमदार सौ. सुलभाताई खोडके यांनी आ. रोहितदादा पवार यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या दरम्यान यश खोडके , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष-प्रशांत डवरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष-ऋतुराज राऊत, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष-आकाश हिवसे, माजी महापौर-ऍड.किशोर शेळके यांच्यासह अन्य कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी सुद्धा पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. जनसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पाठबळ कार्यकर्त्यासोबत आहे. या ताकदीचा वापर करीत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी वाटचाल करतांना पुरोगामी विचारांचा वसा जोपासना करणे गरजेचे आहे. या शब्दात आमदार रोहितदादा पवार यांनी यावेळी कार्यकर्त्यासोबत संवाद साधला.

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ध्येय-धोरणानुसार कार्य करीत आम्ही पक्षाचे सर्व कार्यकर्ते आमदार सौ.सुलभाताई खोडके यांच्या नेतृत्वात तळागाळातील जनतेच्या हक्क व अधिकारांचे रक्षणासाठी प्रयासरत आहोत. असा निश्चयपूर्ण निर्धार सर्वांनी रोहितदादा पवार यांच्या समक्ष व्यक्त केला. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष-मेहबूब शेख, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष-संजय खोडके, यश खोडके, ऍड. सुनिल बोळे, प्रशांत उर्फ गुड्डू धर्माळे, प्रथमेश बोके, प्रजवल घोम, सुयोग तायडे, आकाश निंभोरकर, प्रशांत पेठे, नितीन खंडारकर, योगेश सवई, राजू टाके, संजीव कथीलकर, अनंत पारिसे, जयेश सोनोने, सर्वेश खेडकर, संकेत अलसपुरे, दिग्विजय गायगोले, सागर इंगळे, आकाश कोरडे, प्रवीण भोरे, अभिषेक धुरजड, संकेत बोके, सतीश चरपे, सचिन दळवी, विशाल भगत, छोटू खंडारे, संदीप औसिकर, अभिषेक बोळे, आदिल शेख, अक्षय पळसकर, सूरज आढळके, वैभव तिडके, अनुराग वैराडे, धीरज निंभोकर, सुमित वानखडे, मनिष पाटील, डॉ. आदित्य ढोरे, दिनेश मेश्राम, आदेश चेडे आदीसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व सदस्य व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या