Recent in Technology

Advertisement

Breaking News

नेहरू युवा केंद्र अमरावती द्वारा जागतिक जैव इंधन दिनाचे आयोजन

    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : नेहरू युवा केंद्र, अमरावती, युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय भारत सरकार अंतर्गत जागतिक जैव इंधन दिन, दिनांक 10 ऑगस्ट 2022 रोजी साजरा करण्यात आले.नेहरू युवा केंद्र अमरावती, युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय भारत सरकारअंतर्गत जागतिक जैव इंधन दिन, दिनांक 10 ऑगस्ट 2022 रोजी धामणगाव रेल्वे आणि नांदगावखंडेश्वर या तालुक्यांमध्ये साजरा करण्यात आले.

    नेहरू युवा केंद्र अमरावती यांच्या मार्फत जैविक इंधनाची संकल्पना युवकां पर्यन्त पोहचवण्यासाठी एक छोटे पाऊल उचलण्यात आले आहे. धामणगाव रेल्वे येथिल श्रीराम महाविद्यालय येथे सौ.वृंदा जोशी मॅडम यांनी आपल्या मार्गदर्श नात विद्यार्थ्यांना जैविक इंधन या विषयी माहिती दिली व त्या चे महत्त्व पटवून दिले, तर नांदगांव खंडेश्वर तालुक्यातील सार्शी (कोठोडा) या गावात उदगीर महाराज संस्था हॉल येथे कार्यक्रम पार पडला व प्रमुख मार्ग दर्शक म्हणून श्री.अभय कार्लेकर तसेच वैशाली मॅडम यांनी उपस्थितांना मार्ग दर्शन केले. कार्यक्रमाद्वारे युवकांना जैव इंधनाच्या महत्वा बद्दल सांगण्यात आले.

    पेट्रोल, डिझेल ही इंधन आपल्या कडे मोजक्या प्रमाणात उपलबद्ध आहे ते संपण्याची भीती असल्यामुळे पर्यायी मार्ग म्हणून आपण जैविक इंधनाचा वापर मोठया प्रमाणात करू शकतो तसेच जैव ईंधना मुळे कच्च्या तेलाच्या वर आयातीवरचं अवलंबित्व कमी होतं, पर्यावर्णा चानाश होत नाही, शेतकऱ्यां च्या उत्पन्नात वाढ होते. आणि ग्रामीण भागात रोजगार निर्मिती च्या संधी निर्माण होतात, ह्या गोष्टीं वर प्रकाश टाकण्यात आले. आणि सरकारनं जून 2018 मधे जैव ईंधन राष्ट्रीय धोरणाला मंजुरी दिली. वर्ष 2030 पर्यंत 20 टक्के इथेनॉल-मिश्रण आणि 5 टक्के बायोडीजल-सम्मिश्रण पर्यंत मजल गाठणंहा या धोरणाचा उद्देश आहे. भारत सरकारनं 2014 पासून जैव ईंधन वापर वाढवण्यासाठी अनेक पावलं उचलली आहेत, ह्या सर्व बाबी ह्या कार्यक्रमा द्वारे युवकां पर्यंत पोचवण्यात आली. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी नेहरू युवा केंद्रा च्या तालुका स्वयंसेवक कुं. समीक्षा वडुरकर व नेहरू युवा केंद्रा शी संलग्न युवा मंडळ सदस्य विद्या पुरी हिने अथक परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code