- * वरुड मोर्शी तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान !
वरुड तालुका प्रतिनिधी : दोन दिवसांपासून अतिवृष्टी पावसाची संततधार सुरूच असल्याने वरुड मोर्शी तालुक्यातील काही मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याने पाणी पातळी वाढून नदीनाले तुडुंब भरून वाहत असल्याने नदी, नाल्यांना पूर येऊन काठावरील शेतजमिनी पाण्याखाली गेल्या आहेत. तर काही ठिकणी पुरामुळे संपर्क तुटला आहे. त्यामुळे आमदार देवेंद्र भुयार यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी पावणीत कौर यांना वरुड मोर्शी तालुक्यातील पुर परिस्थितीचा व झालेल्या नुकसानीचा तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तालुका प्रशासनाच्यावतीने तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.
आमदार देवेंद्र भुयार यांनी वरुड मोर्शी तालुक्यातील पूर परिस्थिती जाणून घेतली व नदी काठावरील नागरिकांनी सतर्क राहून सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करण्याचे आदेश आमदार देवेंद्र भुयार यांनी महसूल प्रशासनला दिले आहे.
मोर्शी वरुड मतदारसंघात दिनांक ७ व आज ८ ऑगस्ट रोजीच्या मुसळधार पावसाने नदी, नाल्याना पूर आला असून, नागरी व ग्रामीण भागात अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे, सोबतच शेतीचे सुद्धा नुकसान झाले असून याबाबत मदतकार्य आमदार देवेंद्र भुयार यांच्या मार्गदर्शनामध्ये पदाधिकारी कार्यकर्ते नुकसानग्रस्त भागात मदतकार्य करत आहेत, आमदार देवेंद्र भुयार गेल्या ६ दिवसापासून मुंबई येथे मुंबई येथे स्वाईन फ्लू मुळे ऍडमिट असून या नैसर्गिक आपत्ती बाबत जातीने लक्ष ठेवून असून मा.जिल्हाधिकारी, महसूल प्रशासन, पोलीस, कृषि, आणि NDRF यांच्या सतत संपर्कात आहे.
आमदार देवेंद्र भुयार यांनी नुकसान ग्रस्त भागाचे पंचनामे करण्याबाबत सुद्धा प्रशासनासणाला निर्देश दिले असून, आमदार देवेंद्र भुयार यांच्या वतीने सुद्धा बाधित पूरग्रस्त नागरिकांच्या राहण्याची, जेवण्याची व ईतर आवश्यक मदतीची व्यवस्था ही आमदार देवेंद्र भुयार मित्र मंडळ तर्फे केल्या जात आहे यासाठी आमदार देवेंद्र भुयार यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन आमदार देवेंद्र भुयार यांनी केले असून आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने लवकर बरा होऊन आपल्या सेवेत रुजू होणार असल्याचे सांगून पूरपरिस्थिती मुळे मन व्यथित असून सर्वतोपरी मदतीसाठी मी आपल्या सोबत असल्याचे आमदार देवेंद्र भुयार यांनी यावेळी सांगितले.
0 टिप्पण्या