Header Ads Widget

स्वातंत्र्यदिनी ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिकांचा गौरव

    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) :

      स्वातंत्रदिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘हर घर तिरंगा’ व विविध उपक्रम साजरे करण्यात येत आहेत. याच उपक्रमातंर्गत स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधुन ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक एकनाथ माधवसा हिरूळकर यांचा गौरव करण्यात आला.

      निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल व अधिकाऱ्यांनी श्री. हिरूळकर यांच्या राजापेठ येथील निवासस्थानी जाऊन शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन त्यांचा गौरव केला. यावेळी उपजिल्हाधिकारी रणजित भोसले, तहसिलदार संतोष काकडे, प्रसाद रासेकर आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या