Header Ads Widget

जिल्हा परिषदेत झेंडा विक्री केंद्राचा शुभारंभ

    * स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमित्त ‘हर घर तिरंगा’ उपक्रम
    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त दि. 13 ते 15 ऑगस्टदरम्यान ‘हर घर तिरंगा’, हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने जिल्हा परिषदेत ‘झेंडा विक्री केंद्रा’चा शुभारंभ मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते आज झाला.

    जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी प्रत्येक घरावर तिरंगा लावून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन श्री. पंडा यांनी यावेळी केले. यावेळी सर्व उपमुख्य कार्यकारी अधिकारी, विभागप्रमुख व इतर अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.

    हर घर तिरंगा मोहिमेत सहभागी होण्यासाठी सर्वदूर झेंडे उपलब्ध असावेत, यासाठी ठिकठिकाणी विक्री केंद्रे सुरू करण्यात येत आहेत. उपक्रमाबाबत गावोगाव जनजागृतीही होत आहे. विविध कार्यालये, संस्था यांचा सहभाग उपक्रमात मिळत असून, जिल्ह्यातील सर्व नागरिकांनीही या कालावधीत घरावर तिरंगा लावून स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करावा, असे आवाहन श्री. पंडा यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या