Translate

Gaurav Prakashan

Recent in Technology

Advertisement

Breaking News

शहरातील दूषित पाणी पुरवठ्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

    * धारणीतील घटनेची पुनरावृत्ती होण्याची वाढली चिंता
    * शेकडो कार्यकर्त्यांचा मजीप्रा कार्यालयावर एल्गार
    * फिल्ट्रेशन प्लॅट च्या कामाची चौकशी करण्याचा दिला अल्टिमेटम
    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : गेल्या महिन्यात धारणी भागात दूषित पाण्याच्या पुरवठ्यामुळे ग्रामस्थांना अतिसाराची लागण झाल्याच्या घटनेने राज्यभर चिंता वाढविली होती . या घटनेची पुनरावृत्ती आता अमरावती शहरात होण्याची शक्यता वाढल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. गेल्या आठ दिवसापासून अमरावती शहराला दूषित व गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याने अनेक नागरिकांनामध्ये साथ रोगाची लक्षणे दिसून येत आहे. दूषित पाणी पुरवठामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आक्रमक होऊन मजीप्रा कार्यालयावर धडक दिली.

    मागील काही दिवसांपासून अमरावती शहरातील नळ जोडणीतून दूषित व गढूळ पाणी पुरवठा होत असल्याने साथजन्य आजारांना निमंत्रण मिळत आहे. नळातून येणारे पाणी पिण्या योग्य नसून मजीप्रा प्रशासनाने जल शुद्धीकरण प्रक्रियेसंदर्भात दुर्लक्ष केल्याने शहराला गडुळ पाणीपुरवठा होत आहे. सदर बाब ही नागरिकांच्या आरोग्याशी हयगय करणारी असून यातून कावीळ ,अतिसार , टायफाईड , सारख्या आजारांची लागण होत आहे. त्यामुळे रुग्णालयात नागरिकांची गर्दी वाढली आहे. काही दिवसांपूर्वी धारणीत दूषित पाण्यामुळे रोगराईने हाहाकार केला होता , याची पुनरावृत्ती अमरावतीत होण्याची चिंता अमरावतीकरांमध्ये व्यक्त होत आहे. त्यामुळे अमरावती शहराच्या पाणी पुरवठ्यासंदर्भातील फिल्ट्रेशन प्लॅट किती क्षमतेचा आहे. पिण्यासाठी नागरीकांना मिळणारे पाणी फिल्टर होते की नाही, याची चौकशी करण्याच्या मागणीचे निवेदन मजीप्रा उप -कार्यकारी अभियंता अजय लोखंडे यांना सादर करण्यात आले. जनतेच्या आरोग्याशी हयगय खपवून घेणार नसून त्वरित उपाययोजना न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अमरावती शहर च्या वतीने देण्यात आला.

    निवेदन देतेवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर अध्यक्ष प्रशांत डवरे, माजी महापौर किशोर शेळके, योगेश सवई, प्रमोद महल्ले, आनंद मिश्रा, अजय बोंडे, भूषण बनसोड, मनीष बजाज, संदीप आवारे, आशिष कपले, शक्ती तिडके, श्रीकांत झंवर,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष ऋतुराज राऊत, आकाश हिवसे,प्रतिक भोकरे, संकेत बोके, अनिकेत मेश्राम,अंकित राजगुरे,सुरज अढाळके,आदिल शेख, अक्षय पळसकर,आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते . दरम्यान शहरातील दूषित पाण्याच्या पुरवठ्या संदर्भात राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या वतीने अमरावती महापालिका उपायुक्त भाग्यश्री बोरेकर यांना निवेदन देऊन अवगत करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code