Recent in Technology

Advertisement

Breaking News

निशुल्क - चित्रपट उद्द्योजकता आणि प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन

    * अमरावती स्पंदन परिवार बहुउद्देशीय संस्थेचा उपक्रम
    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : चित्रपट, नाटक, वेब सिरीज, न्यूज चॅनेल, या माध्यमामध्ये रोजगार, व्यवसाय, नोकरीच्या संधी साठी धडपड करणाऱ्या कलावंत तसेच विद्यार्थी यांना चित्रपट उद्योग क्षेत्राची तांत्रिक ओळख आणि निर्मितीचे पायाभूत प्रशिक्षण देण्यासाठी अमरावती स्पंदन परिवार बहुउद्देशीय संस्थेने मंगळवारी ९ ऑगस्ट रोजी बीइंग आर्टिस्ट अकादमी ऑफ फिल्म अँड थिएटर आर्टस्, अमरावती येथे एक दिवशीय "सिनेमा सिनेमा खेळतांना" कार्यशाळेचे आयोजन केले असून सोमवार ८ ऑगस्ट पर्यंत नाव नोंदणी करून कार्यशाळेत सहभाग होऊ शकता.

    चित्रपट तसेच माध्यमाच्या रीतसर शिक्षणानंतर शासकीय संस्था, अशासकीय संस्था, सरकारी कार्यालये, खाजगी संस्थामधे करियर च्या संधी, तसेच फेलोशीप्स, स्कॉलरशिप, अर्थ सहाय्य मिळविण्याचे विविध मार्ग आणि चित्रपट उद्द्योजकता जनगृती करण्याच्या उद्देशाने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे . सोबतच ओ टी टी चेनेल्स, सोशल मीडिया प्लेट्फोर्म्सची उपलब्धता या सर्वाँमुळे अनेक कलावंत आणि विद्यार्थी आपली कला जगासमोर आणण्याचा प्रयत्न करत असतांना गुणवत्तेचा विचार न करता फक्त त्यातून प्रसिद्धी आणि अर्थार्जनाचा प्रयत्न करत असतात परंतु सर्व विषयाचे तांत्रिक प्रशिक्षण महत्वाचे आहे. त्यासाठी चित्रपट निर्मितीची प्रक्रीया, निर्माता, कथा लेखन, दिग्दर्शन, अभिनय, छायाचित्रण, प्रकाश योजना, संकलन, ध्वनी, कला दिग्दर्शन, रंगभूषा, वेशभूषा, जाहिरात व प्रसिद्धी, सेन्सॉर सर्टीफिकेशन, वितरण व्यवस्था,आर्थिक गुंतवणुक व मोबदला या सर्व विभागांची कार्य पद्धती तसेच सिनेमा किंवा चित्रपट म्हणजे काय? कला-व्यवसाय-उद्योग-करियर म्हणून या क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टीकोन कसा असावा? यावर चर्चात्मक मार्ग दर्शन करून काही लघुपटांचे प्रदर्शन करत चित्रपट निरिक्षनात्मक चर्चा प्रश्नोत्तरातुन करण्यात येणार आहे.

    सामाजिक माध्यमांच्या आकर्षणामुळे तसेच सिनेमा क्षेत्राचा रीतसर अभ्यास नसल्यामुळे आजचा युवक भरकटत आहे म्हणून निशुल्क चित्रपट उद्योजक क्षेत्राची जागरूकता तसेच चित्रपट निर्मिती कार्यशाळेला उपस्थित राहण्याचे आव्हाहन बीइंग आर्टिस्ट अकॅडमीचे माजी विद्याथी तथा कार्यशाळेच्या आयोजकांनी केले असून अधिक माहितीसाठी ९०४९४९११५१ या क्रमांकावर संपर्क साधावा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code