Header Ads Widget

वीर वामनराव जोशी प्राथमिक शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न

    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ संचालित, वीर वामनराव जोशी प्राथमिक शाळेत नुकतेच स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात विद्यार्थी व पालकांच्या जल्लोषात संपन्न झाला.

    संस्थेचे प्रधानसचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य व शालेय समिती अध्यक्षा डॉ. सौ माधुरीताई चेंडके यांच्या मार्गदर्शनात संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थ्यांचा, पालकांचा, कर्मचाऱ्यांचा, परिसरातील नागरिकांचा एकूणच सर्वांचा उत्साह अवर्णनीय होता. ऐन झेंडावंदनाच्या समयी सर्वांचा उत्साह बघून पावसानेही आपली हजेरी यावेळी लावली. पण चिमुकले विद्यार्थी सुद्धा आपल्या जागेवरून आपल्या लाडक्या राष्ट्रध्वजाला मानवंदना दिल्याशिवाय यावेळी हलले नाही.

    मुख्याध्यापक दिलीप सदार यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर सामूहिक राष्ट्रगान, प्रतिज्ञा, झेंडागीत, सारे जहाँ से अच्छा हे स्फूर्ती गीत, मेरा मुल्क मेरा देश कृतीयुक्त गीत, इंसाफ की डगर पर अशा अनेक रंगारंग गीतांची विद्यार्थ्यांनी उपस्थितांना मेजवानी दिली. विद्यार्थ्यांनी थोर पुरुषांच्या वेशभूषा या दिवशी साकारल्या होत्या. वेशभूषेतील चिमुकल्यांना बघून पालकांसोबतच परिसरातील ये जा करणाऱ्या नागरिकांनाही विद्यार्थ्यांचे फोटो काढण्याचा मोह आवरला गेला नाही. वेशभूषेतील विद्यार्थ्यांसोबत मुख्याध्यापक व शिक्षकांनी साकारलेल्या मिले सुर मेरा तुम्हारा या कृतीयुक्त गीताने सर्वांचीच वाहवा मिळवली.

    भाविन माहुरे, योगेश इंगोले, आरव राऊत, नवीन चचाने, आयुष मडावी, वेदांत डहाके, श्रेयश सरोदे, सोहम वाघमारे, ऐश्वर्य नागपुरे, अंशू लोहार यांनी पंडित जवाहरलाल नेहरूंची तर रुद्र सारसर याने चंद्रशेखर आजाद ,नागरिकार, प्राजक्ता बांगर, देवयानी भुयार यांनी राणी लक्ष्मीबाई, कार्तिक वानखडे, अरहान खान, अनुष सावरकर, नव्या झांजोटे यांनी भगतसिंग, शेख फाजील याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची, पूर्वी सयाम, नव्या कोहळे यांनी जिजामाता, धनश्री राऊत विरांगणा दुर्गा, आरोही पानकर, राशी कुकडे, ज्ञानेश्वरी जवंजाळ, रागिनी देशकर सावित्रीबाई फुले, शिवानी पाल, ईश्वरी उपरीकर यांनी इंदिरा गांधी, सृष्टी यादव भारत माता, याशिवाय धनश्री हेमने, निखिल मंजेश कुमार, देवेश लांडगे, श्रावणी ठेंगरे, तेजस्विनी लोखंडे, पारुल लोखंडे, मोहम्मद हुसेन, सोहम गंगारे इत्यादी विद्यार्थ्यांनी थोर पुरुषांच्या व क्रांतीकारकांच्या वेशभूषा साकारून कार्यक्रमाची शोभा वाढविली.

    कार्यक्रमास अरुणा मिश्रा, मोनिका पाटील, ज्योती मडावी, सुजित खोजरे, आसावरी सोवळे, सचिन वंदे, संध्या कुऱ्हेकर, मोहिनी कुलकर्णी, श्रद्धा मोहतुरे, विलास देठे, अमोल पाचपोर, दिपाली गंगारे, इत्यादी कर्मचाऱ्यांसह समस्त विद्यार्थी व पालक वृंदाची आवर्जून उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या