Header Ads Widget

भारत माझा देश आहे..!

    खरचं
    भारतीय स्वातंत्र्या
    भारत माझा देश आहे कारे ?
    गेल्या 75 वर्ष्यात
    ना माझ्या आज्याले गावला
    ना बापाला दिसला
    मी ही शोधतो आहे
    गेल्या कित्येक दशकापासून
    माझा भारत देश
    सुजलाम सुफलाम
    कुठं काहीच नाही
    शोधून शोधून
    दिसतो मला उघडा नागडा
    महानगराच्या पाईपलाईन
    जवळ
    रेल्वेच्या पूलाखाली
    देवळाच्या पायथ्याशी ...
    रोजी विना
    उपाशी
    हे माझ्या प्राणप्रिय
    भारता
    इथं शाळा आहे तर
    शिक्षक नाही
    गुन्हेगाराला शिक्षा
    नाही
    भारत माता की
    जय म्हणतात
    बापाचा पत्ता नाही
    खरच भारतीय स्वातंत्र्या
    तुला शोधून थकलो रे
    न्याय मागतो
    तर देशद्रोही ठरतो
    लढतो तर
    एकटा पडतो
    व्यवस्थेच्या नजरेत
    भरतो
    लुच्चे लफांगेचे
    राज आहे
    नसानसात माज आहे
    भारतीय स्वातंत्र्या
    चायवाला रिक्षावाला
    सुपारी घेणारा
    तुझा अमृतमहोत्सव
    साजरा करणार आहे
    आमच्या हातात झेंडा
    गुंडा माल लपेटणार आहे ...
    -राजेंद्र क.भटकर
    बडनेरा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या