बघता बघता बारावी ही संपली...!
याची जाणीव कधीच नाही भासली
बघता बघता बारावी ही संपली
कधी Online तर कधी Offline कॉलेज
काहीच भेटलं नाही यात विद्यार्थ्यांना Knowledge
अकरावीची थोडी पायरीच चढली
बघता बघता बारावी ही संपली
ना दिसला गोंधळ ना चिवचिवाट
आता निवडायची तरी कोणती वाट
नेहमीच मनी येते हि प्रश्नावली
बघता बघता बारावी ही संपली
कोरोनाने दिला काहींना माणुसकीचा धडा
पण रीता ठेवला आमच्या शिक्षणाचा घडा
विषयाची ओळख करून घेण्यातच वेळ गेली
बघता बघता बारावी ही संपली
Physics , Bio , Chemistry
वेळ गेला जानण्यात यांची History
त्यात भूगोल, इंग्लिश, मराठी हि आली
बघता बघता बारावी ही संपली
0 टिप्पण्या