अमरावती (प्रतिनिधी) : भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या हस्ते झाले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाच्या पार्श्वभूमिवर अत्यंत उत्साहात सोहळा झाला. प्रारंभी राष्ट्रध्वज वंदन व राष्ट्रगीत झाले. त्यानंतर जिल्हाधिकारी महोदयांनी सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना भेटून त्यांना शुभेच्छा दिल्या. महसुल भवनात चहापानाचा कार्यक्रम झाला. यावेळी जिल्हाधिकारी महोदयांनी सर्वांशी संवाद साधला.
अतिरीक्त जिल्हाधिकारी रामदास सिध्दभट्टी, निवासी उपजिल्हाधिकारी अशिष बिजवल, उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, रणजित भोसले, मनिषकुमार गायकवाड, राम लंके, विधी अधिकारी नरेंद्र बोहरा, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे, अधीक्षक उमेश खोडके, नाझर किशोर चेडे, जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहायक अमित चेडे, डेविड चव्हाण, अंबादास काकडे, राजू हाते, चक्रधर राहाटे, सनी चव्हाण, सागर काळे आदी उपस्थित होते.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या