Recent in Technology

Advertisement

Breaking News

स्वातंत्र्य हे मिळाले...

  अंधार दूर होता, स्वातंत्र्य हे मिळाले
  हातात हा तिरंगा, आता जिणे कळाले
  वंदून सैनिकांना, गातो खुशाल गाणे
  त्यांच्या पराक्रमाने, वैरत्व हे जळाले
  शेतात राबणारे, सौख्यात आज आहे
  घेण्यास झेप सारे, देशात मुक्त झाले
  लोकोत्तरास देतो, हा मान शांततेचा
  त्यांच्यामुळेच वैरी, सारेच ते पळाले
  होणार काय येथे, आता गुलाम कोणी
  मार्गात मित्रतेच्या, सारे इथे वळाले
  हे भाग्य थोर माझे, मी बाळ भारताचा
  गर्वात राहणारे, येथोनिया पळाले
  शब्दसखा- अजय रमेश चव्हाण,
  तरनोळी, ता. दारव्हा, जि. यवतमाळ
  मो.८८०५८३६२०७
  (Images Credit : Loksatta)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code