- * निरीक्षक पदी अजित ठोकळे यांची नियुक्ती
मुंबई: बारामती शहराच्या विकासाचे इंजिन अधिक गतीमान करण्यासाठी तसेच शोषित,उपेक्षित आणि पीडितांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तळागाळापर्यंत धोरणात्मक योजना पोहचणे आवश्यक आहे. मा.राष्ट्रीय अध्यक्ष बहन सुश्री मायावती जी यांच्या कणखर नेतृत्वात बहुजन समाज पार्टीच हे कार्य योग्यरित्या करू शकते. त्यामुळे सर्वसामान्य शेवटच्या नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आणि शहराचा विकासाकरीता आगामी नगरपालिकेची निवडणूक पक्ष स्वबळावर लढवणार आहे, अशी घोषणा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा.अँड.संदीप ताजने साहेबांनी केली.आगामी बारामती नगर पालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने बारामतीत नुकतीच प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या बैठकीला संबोधित करतांना अँड.ताजने साहेबांनी यासंबंधीची घोषणा केली. प्रदेश प्रभारी मा.हुलगेश भाई चलवादी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच नगर पालिकेच्या निवडणुका लक्षात घेता पक्ष कार्याला अधिक गतिमान करण्यासाठी आणि स्थानिक मुद्यांवर घोरणात्मक निर्णयासाठी पक्षातर्फे नवीन निरीक्षकांची घोषणा केली आहे. बारामती जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच नगर पालिकेच्या निवडणुकीत निरीक्षक म्हणून पार्टीचे प्रदेश सचिव मा.अजित ठोकळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बारामती लोकसभा मतदार संघाचे निरीक्षक म्हणून मा.ठोकळे यांच्याकडे जबाबदारी आहे. नवनियुक्तीमुळे पक्षविस्तार आणि संघटन बळकटीसाठी प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास मा.अँड.ताजने यांनी व्यक्त केला.
शहराच्या विकासासाठी नागरिकांनी बसपाला साथ दिली तरी सर्वकर्षी विकास होईल, असे आश्वासन यावेळी मा.हुलगेश भाई चलवादी यांनी दिले.बसपाच्या हत्ती निवडणूक चिन्ह असलेल्या निळ्या झेंड्याखाली यंदा शहराच्या राजकारणात 'निळी क्रांती' घडेल असा विश्वास चलवादी यांनी यावेळी व्यक्त केला.प्रदेश महासचिव मा.सुदीप गायकवाड, प्रदेश सचिव मा.अजित ठोकळे, मा.सुरेश दादा गायकवाड, मा.भाऊ शिंदे साहेब, मा.शीतल गायकवाड, पुणे जिल्हाध्यक्ष मा.रमेश अप्पा गायकवाड, महासचिव मा.बापू कुदळे, जिल्हा प्रभारी मेहमूद जकाते, कोषाध्यक्ष श्रीपती चव्हाण, जिल्हा सचिव विशाल घाडगे, संतोष सवाने, मनीष कांबळे, दीपक सावंत, आनंद फडतरे, बाबासाहेब सावंत, अनिल दनाने, मिलिंद मिसाळ, किशोर काळे, दादा पठाण, प्रदीप साबळे, राजाभाऊ झोडगे, उमाकांत कांबळे, विशाल सोनवणे, अमन खान, मोहन सोनवणे, माधुरी लोंढे, जयश्री निकाळजे, अभिजीत डेंगळे, लोंढे व जगताप ताई यांच्यासह प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते बैठकीत उपस्थित होते.
0 टिप्पण्या