अमरावती (प्रतिनिधी) : पुलगाव येथील सैन्यदलाच्या स्टेशनचे कमांडर ब्रिगेडियर विनय नायर यांच्या आदेशानुसार अमरावती येथील माजी सैनिक व त्यांच्या कुटूंबीयांना वैद्यकीय उपचार न्यु. 64 के. बी. कार्डचे (ईसीएचएम) वितरण दि. 5 ऑगस्ट 2022 रोजी पॉलिक्लिनिक हॉस्पिटलमध्ये करण्यात येणार आहे.
या उपक्रमामुळे अमरावती व यवतमाळ येथील माजी सैनिक व त्यांच्या कुटूंबियांना, ज्येष्ठ माजी सैनिकांना पुलगाव येथे जाण्याची गरज नाही. ईसीएचएम कार्ड घेण्यासाठी यापूर्वी (एक्स सार्व्हिस मॅन कॉन्ट्रीब्युटरी हेल्थ स्किम) पुलगाव येथील मुख्यालयी जाण्याची समस्या या वैद्यकीय उपचार कार्डाचे वाटप करुन ब्रिगेडियर श्री विनय नायर यांनी सोडविली. पुलगाव येथील स्टेशन कमांडर म्हणून ही त्यांची उत्कृष्ट कामगिरी ठरली असुन ब्रिगेडिअर विनय नायर, यांनी संबंधित यंत्रणांना कार्ड वितरणाचे आदेश दिले. माजी सैनिकांनी या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन रिटायर्ड कर्नल आर. डी. गौर यांनी केले आहे. नंदकिशोर जळके आदी यावेळी उपस्थित होते.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या