Recent in Technology

Advertisement

Breaking News

‘हर घर तिरंगा’ मोहिमेत अधिकाधिक लोकसहभाग मिळवा - विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे

  गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

  अमरावती (प्रतिनिधी) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘हर घर तिरंगा’ मोहिमेत उत्स्फुर्तपणे सहभागी होण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहन द्यावे. या अभियानांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. हे अभियान व्यापक प्रमाणात राबविण्यासाठी योग्य नियोजन करण्याच्या सुचना विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी सर्व विभागप्रमुखांना दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आढावा बैठकीत ते बोलत होते.

  आमदार प्रवीण पोटे पाटील, जिल्हाधिकारी श्रीमती पवनीत कौर, पालिका आयुक्त प्रविण आष्टिकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) गिरीष धायगुडे, कैलास घोडके, माविमचे समन्वयक सुनिल सोसे, किरण पातुरकर उपस्थित होते.

  जिल्ह्यातील महापालिका, नगर पालिका, व पंचायत समिती मिळुन 5 लक्ष 73 हजार घरांना 17 पुरवठादारांनी तिरंगा ध्वज पुरविले असुन इतर स्वयंसेवी संस्थांकडुन 18 हजार 500 ध्वज वितरीत करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्याद्वारे गोळा करण्यात आलेल्या निधीतुन 5 हजार ध्वज चिखलदरा तालुक्यातील ग्रामस्थांकरीता पाठविण्यात आले. शासनाकडुन प्राप्त 1 लक्ष दहा हजार ध्वज जिल्हा परिषद, महानगर पालिका व नगर पालिकांना विक्रिकरीता वितरीत करण्यात आले असुन त्यांच्या स्तरावरुन विविध विक्री केंद्रावरुन ध्वजविक्री सुरु असल्याची माहिती श्री बिजवल यांनी दिली.

  विविध उपक्रमांचे आयोजन

  सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिल कार्यालय व इतर शासकीय कार्यालयांमध्ये सेल्फी पॉईंट तयार करण्यात आले आहे. विभागातील महाविद्यालयांमध्ये सांस्कृतीक स्पर्धांचे आयोजन, क्रिडा विभागाकडुन सायकल रॅली, पोलीस विभागाकडुन पोलीस वसाहतीत वृक्षारोपण, शस्त्र प्रदर्शन, माजी सैनिकांचा सत्कार, मावीमच्या बचत गटांच्या माध्यमातून ध्वजसंहितेबाबत जनजागृती करणारे पथनाट्य, बचत गटांच्या महिलांनी तयार केलेल्या 18 हजार झेंड्याचे वितरण केले असुन महिलांची 620 गांवामधून रॅली, महापालीकेअंतर्गत चित्ररथ, पथनाट्य, प्रभातफेरी, 99 संघटना मिळुन नेहरु मैदान येथून रॅलीचे आयोजन, पालीकेच्या 395 शाळांमधून 1 लाख विद्यार्थ्यांच्या माध्यमातून घरोघरी झेंड्यांचे वितरण, उड्डाण पुलावर रोषणाई, पुरवठा विभागातंर्गत 1900 राशन दुकानातुन तिरंग्याचे वितरण करण्यात येणार आहे. विविध विभागाकडुन माहिती श्री. पांढरपट्टे यांनी यावेळी घेतली. हर घर तिरंगा मोहिमेत घेण्यात येणाऱ्या सर्व कार्यक्रम, विविध आयोजनांचे फोटो शासनाच्या संकेतस्थळावर वेळोवेळी अपलोड करण्यात यावे, असे त्यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code