कलेसाठी वाहिलेस तू जीवन..!
होऊनी कलावंत या महाराष्ट्राचा..!!
झिजली तुझी लेखनी दीन दुबळ्यांसाठी..!
डफावरी मारिली थाप या महाराष्ट्र लढ्यासाठी..!!
दीड दिवसांची अवघी शाळा,
केले विपुल मराठीत लेखन,
मिळविला साहित्यात मान,
ठरली फकिरा मराठीची शान ||१||
विद्रोही कलावंत,साहित्यरत्न,
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे,
पोहचले हो, सातासमुद्रापार,
नाव झाले त्यांच्या साहित्याचे मोठे ||२||
धन्य अण्णाभाऊंची लेखनी,
पोहचली हो सातासमुद्रापार,
मिळाला त्यांस हो बहुमान,
झाले साहित्य अजरामर ||३||
धन्य ते अण्णाभाऊ साठे,
जणू साहित्याचं विद्यापीठ,
उमटली कर्तृत्ववाची मोहर,
परकिय २२ भाषांतरात थेट ||४||
धन्य धन्य तो शाहिर,
जन्माला या भुमीवर,
लेखनीस वाहिले जीवन,
साहित्याने झाला अजरामर ||५||
धन्य लोकशाहीर अण्णाभाऊ साठे,
उधळली कवने मराठी साहित्याची,
गाऊनी शौर्य गाथा, वाजे शाहिरी डफ,
लेखनी अण्णाभाऊंची शान महाराष्ट्राची
- प्रविण खोलंबे.
संपर्क - ८३२९१६४९६१
0 टिप्पण्या