Featured Post

Translate

Gaurav Prakashan

Recent in Technology

Advertisement

Breaking News

द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांकरीता व त्यांच्या पालकाकरीता निवेदन

    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : शालांत परीक्षा उतीर्ण झाल्यानंतर इयत्ता 11 वी मध्ये प्रवेश घेतांना द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रमाला (1. कम्पॅुटर सायंन्स 2. फ्रेश वॉटर फिश कल्चर 3. इलेट्रॉनिक्स 4. हॉर्टिकल्चर 5. ॲनिमल सायंन्स 6. फिश प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी 7. स्कुटर मोटर सर्व्हिसिंग ) प्रवेश घेण्याचा विद्यार्थ्यांचा कल असतो. त्याचा फायदा घेऊन जिल्ह्यातील काही संस्था त्यांच्या कडे या अभ्यासाक्रमाला कायमस्वरूपी मान्यता नसतांना प्रवेश करून घेतात. अशा प्रकारचे प्रवेश हे अनधिकृत प्रवेश ठरतात. अशा संस्था कृषी, पशु, व मत्स्य विज्ञान, आरोग्य विज्ञान, उच्च तंत्र व व्यवसाय शिक्षण या मधील अनधिकृत संस्था स्थापण करणे आणि अनधिकृत अभ्यास पाठ्यक्रम सुरु करणे (प्रतिबंध) अधिनियम 2013 अन्वये कार्यवाहीसाठी पात्र ठरतात. अशा संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान व त्यांच्या पालकाचे आर्थिक नुकसान होऊन मानसिक त्रास होतो.

    विद्यार्थी व पालकांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ नये, या करीता अमरावती जिल्ह्यातील द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रमाला कायम स्वरूपी मान्यता असलेल्या संस्थांची यादी सोबत जोडली आहे, त्याची सर्वांनी नोंद घ्यावी. अमरावती जिल्ह्यामध्ये द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रम राबविणाऱ्या शासकीय संस्था - 01, अशासकीय अनुदानित संस्था -09, व अशासकीय विनाअनुदानित संस्था -57 अशा एकूण 67 अधिकृत संस्था आहेत. या यादी व्यतिरिक्त इतर संस्थेत वर नमूद व्दिलक्षी व्यवसाय अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ नये. याबाबत काही अडचण असल्यास जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालय, शासकीय तंत्र शाळा परिसर, बस स्टँड रोड अमरावती येथे संपर्क करावा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code