Recent in Technology

Advertisement

Breaking News

सेवानिवृत्त शिक्षिका श्रीमती शारदा कठाणे यांचा सत्कार सोहळा व कविसंमलेन संपन्न

    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : आर्वी येथील शिक्षिका श्रीमती शारदा कठाणे यांचा सेवानिवृत्ती निम्मित्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. रोशन मंगल कार्यालय, आर्वी येथे संपन्न झाला. प्रथम सत्राचे अध्यक्ष डॉ. विनोद गंभीर होते. प्रमुख अतिथी मा. हरीश धार्मिक सर (उपविभागीय अधिकारी, आर्वी ), रवींद्र ठाकरे सर, यशवंत मनवरे सर, गजानन मनवरे, सत्कार मूर्ती श्रीमती शारदा कठाणे यांचा सत्कार पथदर्शक परिवार यांनी केला.स्वागत गीत जयमाला माहुरे यांनी म्हटले.प्रस्तविक यशवंत मनवरे यांनी केले.संचालन कवयित्री रत्ना मनवरे यांनी केले. आभार कवी प्रशांत ढोले यांनी मानले.

    दुसऱ्या सत्रात निमत्रितांचे कविसंमलेन पार पडले. कविसंमलेनाचे अध्यक्ष गझलकार प्रकाश बनसोड, आर्वी होते. सहभागी कवी म्हणून डॉ. नंदकिशोर दामोदरे अमरावती, गणेश लांडगे अमरावती, रत्ना मनवरे, अमरावती, संजय ओरके, पुलगाव, सुरेश मेश्राम, पुलगाव, प्रशांत ढोले, वर्धा, सुषमा पाखरे, वर्धा, सौ. प्रीती वाडिभस्मे, वर्धा, सुरेश भिवगडे, आर्वी, विदयानंद हाडके, आर्वी,चंदू गाडगे, भारसवाडा, अजय चिंचोळे, आर्वी या कविनी आपल्या कविता सादर केल्या. बहारदार संचालन युवा गझलकार रोशन गजभिये यानी केले.

    हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सागर कठाणे, रोशनी दहाट,सिद्दार्थ दहाट, डॉ. प्रज्ञा विनोद गंभीर, रत्ना मनवरे, यशवंत मनवरे यांनी प्रयत्न केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code