- दोन मनांचं मीलन
- जीवनाचं खरं धन;
- मैत्री म्हणजे सुखांची
- मनसोक्त उधळण.
- मैत्रीचं रोपटं जेव्हा
- मनात फुलू लागतं;
- कुबेरी धनही तेव्हा
- क्षुल्लक वाटू लागतं.
- विश्वासाच्या पायावर
- सदैव उभी असते;
- कोणत्याही बंधनात
- मैत्री बंदिस्त नसते.
- संकटांशी लढताना
- वादळ होऊन येते;
- जीवनाच्या लढाईत
- मैत्री तलवार होते.
- सगळ्या नात्यांना आता
- लागले आहे ग्रहण;
- कोणीही कोणाचं नाही
- जुगार झाले जीवन.
- सुंदर जीवनासाठी
- विश्व वाचले पाहिजे;
- विश्व वाचविण्यासाठी
- मैत्री केलीच पाहिजे...!
- - मिलिंद हिवराळे
- बार्शिटाकळी, जि. अकोला
- भ्र. 7507094882
- ईमेल : milindhiwarale@yahoo.com
0 टिप्पण्या