मुंबई, : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास' कार्यक्रमात भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत 'समूह राष्ट्रगीत गायन' या विषयावर सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव विलास थोरात यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या २२ केंद्रावरून तसेच 'न्यूज ऑन एआयआर' या ॲपवरून बुधवार दि.१७ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. वरिष्ठ सहायक संचालक वर्षा आंधळे यांनी ही मुलाखत घेतली आहे.
या मुलाखतीत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त समूह राष्ट्रगीत गायन ही संकल्पना,या उपक्रमात सर्वसामान्य नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी केलेले प्रयत्न याबद्दल उपसचिव विलास थोरात यांनी सविस्तर माहिती दिली आहे.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या