Recent in Technology

Advertisement

Breaking News

राज्याच्या विकासासाठी सत्तांतराचा सुर्योदय महत्वाचा-आनंद रेखी

    शिवसेना पक्षप्रमुखांनी शुभआशिर्वादासह सरकारच्या पाठीशी राहण्याचे आवाहन

    मुंबई : महाराष्ट्रात तब्बल अडीच वर्षानंतर झालेल्या सत्तांतराचा सुर्योदय विकासाची नवीन उर्जा घेवून आलेला आहे,असे ठाम मत भाजप नेते आनंद रेखी यांनी गुरूवारी व्यक्त केले.राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसमुळे राज्याचा रखडलेल्या विकासासाठी भाजप-शिवसेना सत्तेत येणे आवश्यक होतेच,अशी भावना देखील यानिमित्ताने त्यांनी व्यक्त केली.वारंवार हिंदुत्वाच्या मुद्दयावर या दोन्ही पक्षाने एकत्रित येण्याची आवाहन केले होते,आता हे दोन्ही पक्ष एकत्रित असल्यानंतर सत्तेचा गाडा हाकतांना भाजपला शिवसेना पक्षप्रमुखांची मोलाची साथ हवी आहे.त्यांच्याच शुभआशिर्वादाने मराठी अस्मिता आणि हिंदुत्वासह बदलाची कास राज्य सरकार धरेल,असे रेखी म्हणाले.

    देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात बनणाऱ्या सरकारच्या काळात इतर मागासवर्गीयांचा (ओबीसी) राजकीय आरक्षणाचा तिढा सुटेल.महाविकास आघाडी सरकारमधील कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अकार्यक्षमतेमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे राजकीय आरक्षण सरकारला गमवावे लागले होते. पंरतु, आता फडणवीस सत्तेवर आल्यानंतर ओबीसीं बांधवांच्या मनात आरक्षणासंबंधी विश्वास निर्माण झाला आहे, असे रेखी म्हणाले.

    पक्षप्रमुखांनी स्वकीयांवर असलेली नाराजी सोडून पुन्हा त्यांना शुभआशिर्वाद द्यावेत,असे देखील आनंद रेखी म्हणाले. शिवसेना भाजपचा सदैव मोठा भाऊच राहील. राज्याच्या हितासाठी या पक्षांची नैसर्गिक युतीच आवश्यक आहे, अशीच भूमिका सदैव मांडली आहे. पंरतु, काही नेत्यांच्या पक्षविरोधी भूमिकांमुळे शिवसेना आणि भाजपमध्ये अंतर निर्माण झाले होते.२५ वर्ष जुनी युती त्यामुळे तुटली. याचे शल्य मा.देवेंद्र फडणवीस आणि मा.उद्धव ठाकरे यांच्या मनात होतेच. पंरतु, आता एनसीपी आणि कॉंग्रेसच्या राजवटीतुन महाराष्ट्राची सुटका झाली आहे. अशात मोठा भाउ म्हणून आदरणीय उद्धव ठाकरे यांनी फडणवीस आणि शिंदे यांना आशिर्वाद द्यावा, अशी विनंती रेखी यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code