अमरावती (प्रतिनिधी) : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KASAN) योजनेअंतर्गत नोंदणीकृत पात्र शेतकऱ्यांची e-kyc व (NPCI seeded) बॅक खात्यासोबत आधार संलग्न करण्यासाठी दि. 31 ऑगस्ट 2022 पर्यत मुदतवाढ देण्यात आली आहे. पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी बॅक खात्यासोबत आधार संलग्न करावे असे निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल यांनी कळविले आहे.
पीएम किसान योजनेअंतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांना e-kyc प्रमाणीकरणाची प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली असून सर्व पात्र लाभार्थ्यांना e-kyc करण्यासाठी OTP किंवा बायोमॅट्रिक हे पयार्य उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
पीएम प्रधानमंत्री योजनेअंतर्गत अमरावती जिल्ह्यातील बॅक खाते सोबत आधार संलग्न करणेकरीता प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांच्या तालुकानिहाय गावनिहाय याद्या amravati.gov.in संकेतस्थळावर सुचना/घोषणा प्रसिध्द करण्यात येत आहे. amravati.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेल्या यादीतील ज्या लाभार्थ्यांनी बॅक खाते सोबत आधार संलग्न केले नसेल त्यांनी दि. 31 ऑगस्ट 2022 पर्यत e-kyc करणेकरीता केंद्राशी संपर्क साधून किंवा pmkisan.gov.in या संकेतस्थळावर Farmers Cornere-kyc NEWS हा पयार्य निवडून तसेच संबंधीत बॅकेशी संपर्क साधावा, असे निवासी उपजिल्हाधिकारी अशिष बिजवल यांनी कळविले आहे.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या