Header Ads Widget

पायाभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी 31 पर्यंत प्रस्ताव सादर करावे

    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका, नगरपरिषद शाळा, अपंग शाळा यांचे कडून पायाभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजनेंतर्गत दोन लाख रुपये अनुदानाचा लाभ घेण्यासाठी विहित नमुन्यात दिनांक 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.

    योजनेचा लाभ घेण्यासाठी अल्पसंख्याक समाजाचे (मुस्लिम, बौध्द, ख्रिश्चन, जैन, शिख, पारशी व ज्यू मिळून) किमान 70 टक्के विद्यार्थी शिकत असणे आवश्यक आहे. शासन मान्यताप्राप्त अपंगाच्या शाळांमध्ये किमान 50 टक्के अल्पसंख्याक विद्यार्थी शिकत असणे आवश्यक आहे. या योजनेंतर्गत पायाभूत सुविधांसाठी अनुदान देय आहे. शाळेच्या इमारतीचे नुतणीकरण व डागडुजी, ग्रंथालय अद्ययावत करणे, संगणक कक्ष उभारणे, शैक्षणिक कार्यासाठी आवश्यक फर्निचर, इनव्हर्टरची सुविधा निर्माण करणे, अध्ययनाची साधने एल. सी. डी. प्रोजेक्टर, अध्ययनासाठी लागणारे विविध सॉफ्टवेअर इत्यादी, इंग्रजी लॅग्वेज लॅब, शुध्द पेयजलाची व्यवस्था करणे, प्रयोगशाळा उभारणे, प्रसाधनगृह, स्वच्छतागृह उभारणे, झेरॉक्स मशिन, संगणक हार्डवेअर, सॉफ्टवेअर आदींची व्यवस्था करणे.

    शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांनी संपूर्ण भरलेला अर्ज जिल्हाधिकारी कार्याल्यातील नियोजन भवन येथील नियोजन शाखेत दि. 31 ऑगस्ट 2022 पर्यत सादर करावा. यापूर्वी ज्या संस्थांनी प्रस्ताव सादर केलेले आहेत. त्या संस्थांनी पुन्हा प्रस्ताव सादर करु नयेत. प्रत्येक शैक्षणिक संस्थेने DIES CODE औद्योगिक प्रशिक्षण संस्थानी Institute Code तसेच अपंग शाळांनी लायसन्स नंबर देणे आवश्यक आहे. विहित मुदतीनंतर प्राप्त झालेले प्रस्ताव ग्राह्य धरले जाणार नाहीत. शासन निर्णय व अर्जाचा नमुना http://mdd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या